हिंदी-चिनी भाई भाई! संरक्षणमंत्री यांची संसदेत घोषणा

Rajnath Singh

नवी दिल्ली : भारत (India) आणि चीन (China) सीमेवरील पँगाँग लेक (Pangong Lake) भागात गेल्या दीड वर्षांपासून तणावपूर्ण वातावरण होते. यानतंर दोन्ही देशांचे सैन्य एकमेकांविरुद्ध उभे झाले. दोन्ही देशांमधील विवाद चर्चेला सुरुवात झाली होती. या देशांच्या सैन्य तुकड्या मागे घेण्याबाबत करार झाला. अशी माहिती संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी आज राज्यसभेत दिली. यापूर्वी बुधवारी चीनने करारासंबंधी घोषणा केली होती.

“भारताची एक इंचही जमीन कोणत्याही देशाला घेऊ देणार नाही. चीनशी बोलणी करताना भारताने आपले मुद्दे आक्रमकपणे मांडले. काही उर्वरित मुद्द्यांवर चीनसोबत चर्चा चालू आहे. परस्पर चर्चा व सहकार्याने प्रश्न सोडविण्यात येतील. आतापर्यंत झालेल्या बैठकीत भारताने काही गमावले नाही, तर चीन उर्वरित मुद्यावर गांभीर्याने विचार करेल.” असे आश्वासन संरक्षणमंत्र्यानी संसदेत दिले.

चर्चेदरम्यान भारताने तीन मुद्दे मांडले. ‘एलएसीचा (The Line of Actual Control) दोन्ही देशांनी आदर करावा. जैसे थे स्थितीत एका बाजूने बदल करू, सर्व समझोत्याचे भारत आणि चीन या देशांनी पालन करावे.’ या चर्चेमुळे दोन्ही देशांमधील तणाव कमी होण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER