हिमायतनगर नगरपंचायत पोटनिवहमाडणुकीत काँग्रेसच्या अजगरी बेगम विजयी

Ajgari Begum

हिमायतनगर:- हिमायतनगर नगरपंचायत पोटनिवडणुकीचा दि. 7 शुक्रवारी अंतिम निकाल घोषित करण्यात आला. या निवडणुकीत पुन्हा एकदा काँग्रेसचे आमदार माधवराव पाटील जवळगांवकर यांचे वर्चस्व प्रस्थापित झाले. काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार अजगरी बेगम ह्या चांगल्या मताधिक्याने विजयी झाल्या आहेत. त्यांनी त्यांच्या प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार खान करमूबी जाफरखान यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला आहे.

हिमायतनगर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत वार्ड क्रमांक 13 मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवून हिनाबी सरदारखान निवडून आल्या होत्या. परंतु त्यांचे अल्पशा आजारानेत्यांचे आकस्मिक निधन झाले होते. त्यांच्या रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीसाठी दि. 6 गुरूवारी प्रत्यक्षात मतदान घेण्यात आले तर दि. 7 शुक्रवारी अंतिमतः निकाल जाहीर करण्यात आला.

यामध्ये राष्ट्रवादी च्या खानकरमूबी यांना 292 मते मिळाली तर अपक्ष सुफिया बेगम यांना 194 मते मिळाली असून काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार अजगरी बेगम अ रहेमान यांना सर्वाधिक 633 मते प्राप्त झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी महेश वडदकर, सहाय्यक अधिकारी तथा तालूका दंडाधिकारी एन. बी. जाधव यांनी विजयी घोषीत केले. पोटनिवडणूक वार्ड क्रमांक 13 मध्ये 1485 मतदारांपैकी एकूण 1117 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, मतदान प्रक्रियेत 630 पुरुष तर 497 महिलांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवला. मतदान शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस निरीक्षक भगवान कांबळे यांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष साजरा केला.