अखेर हिमंत बिस्व सरमा यांनी मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ!

Himant Biswa Sarma took oath as Assam cm

गुवाहाटी : आसामचे (Assam CM) १५ वे मुख्यमंत्री म्हणून हिमंत बिस्व सरमा (Himant Biswa Sarma) यांनी शपथग्रहण केलीय. राज्यपाल जगदीश मुखी यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि गोपनियतेची शपथ दिली. या कार्यक्रमात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हेदेखील सहभागी झाले होते. आज मुख्यमंत्र्यांसोबत १३ मंत्र्यांचाही शपथविधी पार पडला. यात भाजपचे १०, एजीपीच्या २ आणि यूपीपीएलच्या १ आमदाराचा समावेश आहे.

माजी मुख्यमंत्री सर्बानंद सोनावल आणि हेमंत बिस्वा सरमा यांना शनिवारी दिल्लीमध्ये बोलवले होते . यावेळी या दोन नेत्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यानंतर हिमंत बिस्व सरमा हेच आसामचे नवे मुख्यमंत्री असतील अशी चर्चा झाली.

आसाम विधानसभा निवडणुकीनंतर भाजपा विधानसभेच्या बैठकीत मुख्यमंत्री म्हणून हिमंत बिस्व सरमा यांच्यावर शिक्कामोर्तब झाले. माजी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनीच या बैठकीत सरमा यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. यावर सर्व सदस्यांनी सहमती दर्शवली. त्यानंतर राज्यपालांची भेट घेत सरमा यांनी सत्ता स्थापनेचा दावा केला होता. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याअगोदर हेमंत बिस्वा सरमा यांनी गुवाहाटीच्या कामाख्या मंदिरात, उत्तर गुवाहाटीच्या दौल गोविंद मंदिरात पूजा-अर्चना केली.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button