हिमाचल प्रदेश : राज्यपालांना धक्काबुक्की; काँग्रेसचे आमदार निलंबित

Bandaru Dattatreya

शिमला : हिमाचल प्रदेशचे (Himachal Pradesh) राज्यपाल बंडारू दत्तात्रय (Bandaru Dattatreya) यांना धक्काबुक्की केल्याबद्दल विधानसभेचे विरोधी पक्ष नेते आणि कॉंग्रेसच्या (Congress) इतर चार आमदारांना अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित करण्यात आले आहे.

आज अधिवेशनाचे अभिभाषण संपल्यानंतर राज्यपाल बंडारू दत्तात्रय परत जात असताना विरोधी पक्षनेते मुकेश अग्निहोत्री यांच्यासह काँग्रेसच्या आमदारांनी त्यांना धक्का-बुक्की केली, असे संसदीय कामकाज मंत्री सुरेश भारद्वाज यांनी सांगितले.

मुख्यमंत्री जयराम ठाकूर (Jai Ram Thakur) यांनी कॉंग्रेस आमदारांच्या वर्तणुकीची निंदा केली असून असे प्रकार व्हायला नकोत, असे त्यांनी म्हटले आहे. विरोधी पक्षनेते मुकेश अग्निहोत्री यांच्यासह कॉंग्रेसच्या हर्षवर्धन चौहान, सुंदरसिंह ठाकूर, सतपाल रायजादा आणि विनोद कुमार यांना निलंबित करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER