सुवर्णकन्या हिमा दासने पटकाविले चार सुवर्ण पदके

Hima Das

नवी दिल्ली :- भारताची आघाडीची धावपटू सुवर्ण कन्या म्हणून ओळख असलेल्या हिमा दासने गमावलेला फार्म पुन्हा कायम राखत चौथे पदक पटकाविले. तिने आपली सुवर्ण धाव कायम राखताना गेल्या १५ दिवसांत तब्बल चौथे सुवर्ण पदक जिंकण्याचा पराक्रम केला. झेक प्रजासत्ताक येथे झालेल्या टबोर अ‍ॅथलेटिक्स मीट स्पर्धेत हिमाने २०० मीटर शर्यतीत सुवर्ण कामगिरी केली. २३.२५ सेकंदाची वेळ देत तिने शानदार बाजी मारली. तिच्या या सुवर्ण पदकासह भारताच्या शिरपेचात एक मनाचा तुरा खोवला गेला आहे.

या जबरदस्त कामगिरीनंतर १९ वर्षीय हिमाला संपूर्ण देशातून शुभेच्छांचे संदेश मिळत आहेत. सोशल मीडियावरही हिमावर मोठ्या प्रमाणात कौतुकांचा वर्षाव होत आहे. विशेष बाब म्हणजे हिमाने २०० मीटर शर्यतीत बाजी मारली असून दुसरीकडे, मोहम्मद अनस याने ४०० मीटर शर्यतीत अभिमानाने तिरंगा फडकावत सुवर्ण पदकावर नाव कोरले. त्याने ४५.५० सेकंदाची वेळ देत सुवर्ण पदकावर कब्जा केला.

ही बातमी पण वाचा : तेंडूलकर, डोनाल्ड व फिट्ज़पैट्रिक यांना हॉल अॉफ फेमचा सन्मान

दुसरीकडे, अनसने १५ दिवसांत ३ सुवर्ण पदकांसह एक कांस्य पदक जिंकले. कुटनो स्पर्धेत त्याने ४०० मीटर शर्यतीत २१.१८ सेकंदासह सुवर्ण जिंकले होते. मात्र पोजनान स्पर्धेत त्याला २०.७५ वेळेसह तिसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले होते.

हिमाची सुवर्ण कामगिरी
२ जुलैला पोजनान अ‍ॅथलेटिक्स
ग्रां. प्री. स्पर्धेत २०० मी. २३.६५ सेकंदासह शर्यतीत सुवर्ण.
७ जुलैला कुटनो अ‍ॅथलेटिक्स
मीट स्पर्धेत २०० मीटर शर्यतीत २३.९७ सेकंदासह सुवर्ण.
१३ जुलै झेक प्रजासत्ताक
येथे क्लांदो अ‍ॅथलेटिक्स २०० मीटर शर्यतीत २३.४३ सेकंदासह सुवर्ण.

हिमाने हे चारही पदके याच जुलै महिन्यात फक्त १५ दिवसांच्या अंतराने कमावली आहेत. तिच्या या सुवर्ण कामगिरीला भारतवासियांनी सलाम केला आहे.

ही बातमी पण वाचा : भारताच्या पी.व्ही.सिंधूची संघर्षपूर्ण विजयासह उपांत्यपूर्व फेरीत धडक