अर्थसंकल्पीय भाषणाची ठळक वैशिठ्ये

Ajit Pawar Maharashtra Budget 2021

मुंबई : जागतिक महिला दिनी सादर केलेल्या महाविकास आघाडी सरकाच्या (Mahavikas Aghadi) अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी महिलांसाठी मोठ्या घोषणा केल्यात.

राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजनेत महिलांच्या नवे घर खरेदी करणाऱ्यांना मुद्रांक शुल्कात १ टक्का सूट मिळेल.

ग्रामीण भागातून तालुक्याच्या, जिल्ह्याच्या ठिकाणी शिकण्यासाठी जाणाऱ्या १२ वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले’ योजनेत निःशुल्क बस प्रवासाची तरतूद करण्यात आली आहे.

आरोग्य (Health)

कोरोना काळात राज्याच्या आरोग्य क्षेत्रामधील अनेक त्रुटी उघड झाल्या. या त्रुटी दूर करण्यासाठी अजित पवार यांनी राज्यात ५ जिल्ह्यांमध्ये नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्याची घोषणा केली. तसेच, पुण्याच्या ससून रुग्णालयातील वर्ग ४ च्या कर्मचाऱ्यांसाठी देखील महत्त्वाची घोषणा केली आहे.

राज्यात सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, नाशिक, रायगड, सातारा, अमरावती आणि परभणी येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन होणार आहेत. पदवी स्तरावरील १९९० तर पदव्युत्तर स्तरावर १ हजार विद्यार्थ्यांच्या जागा वाढणार आहेत.

कृषी (Agriculture)

‘महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९’ अंतर्गत ३१ लाख २३ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर १९ हजार ९२९ कोटी रुपये थेट वर्ग करण्यात आले आहेत. या शेतकऱ्यांचा नवे कर्ज मिळवण्याचा मार्गही यामुळे मोकळा झाला आहे, अशी माहिती पवार यांनी दिली.

तीन लाखांपर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्के व्याजदराने देण्यात येणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या बळकटीसाठी २ हजार कोटी, पशुसंवर्धन आणि मत्स्य योजनेसाठी ३७०० कोटी, विकेल ते पिकेल या योजनेसाठी २ हजार १०० कोटी, कृषीपंपाच्या जोडणीसाठी १५०० कोटी तर सिंचनासाठी जलसंपदा विभागाच्या प्रकल्पांना १२ हजार ९१९ कोटी, जलंसधारण प्रकल्पांसाठी २ हजार ६० कोटींची तरतूद केली असून गोसीखुर्द प्रकल्पासाठी १ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

पायाभूत सेवा

पायाभूत सेवांच्या उभारणीत कोकणाच्या विकासासाठी मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गाला पर्यायी महामार्ग बांधणार असल्याची घोषणा केली. हा रस्ता ५४० किलोमीटर लांबीचा असेल अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.

अनेक दशकांपासून चर्चेत असणारा रेवस (जि. रायगड) ते रेडी (जि. सिंधुदुर्ग) या महामार्गासाठी ९ हजार ५७३ कोटींची घोषणा महाविकास सरकारने केली आहे. हा महामार्ग एकूण ५४० कि. मी. लांब आहे.

अर्थसंकल्पीय भाषण २०२१

अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER