जाणून घ्या जगातील महागडे 10 फूटबॉलपटू कोण आहेत?

Highest earner footballers today

फूटबॉल हा भरपूर कमाईवाला खेळ आहे.आघाडीचे क्लब अलीकडे उत्तम कौशल्य असणाऱ्या खेळाडूंसोबतच ज्यांची सोशल मीडियावर चांगली छाप आहे असे खेळाडू शोधत असतात. रियाल माद्रिद, मँचेस्टर युनायटेड, इंटर मिलान, युवेंटस, बार्सिलोना असे क्लब आघाडीच्या खेळाडूंच्या शोधात असतात आणि त्यांच्या मागणीमूळे खेळाडूंना खोऱ्याने पैसे मिळतात.

अशा खोऱ्याने पैसे खेचणाऱ्या फूटबॉलपटूंची यादी काढली तर त्यातील टॉप टेन मध्ये मेसुत ओझील, डेव्हिड डे गेया, कायलीन एमबाप्पे, इडन हाझार्ड, गेरेथ बेल, अँतोईन ग्रिझमान, लुईस सुआरेझ, नेमार, रोनाल्डो आणि मेस्सी हे नावे येतात.

10- मेसूट ओझील

अर्सेनलचा खेळाडू मेसुट ओझील याची कमाई महिन्याला 16 लाख 40 हजार युरोची आहे. तो अर्सेनलचा सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू आहे. 2013 मध्ये तो रियाल माद्रिदकडून अर्सेनलकडे आला तेंव्हा 5 कोटी युरोची विक्रमी रक्कम त्याला मिळाली होती.

9- डेव्हिड डी गिया

 

मँचेस्टर युनायटेडचा डेव्हिड डी गिया हा त्याच्या पिढीतील सर्वोत्तम गोलकीपर मानला जातो. त्याची महिन्याकाठी कमाई 17 लाख 60 हजार युरोंची आहे. 2011 मध्ये 25 लाख युरोच्या किमतीत तो,ऍटलेटिको माद्रिदकडून मँचेस्टर युनायटेडकडे आला.

8- कायलियन एमबाप्पे

पॅरिस सेंट जर्मेनच्या कायलियन एमबाप्पेची महिन्याला कमाई 19 लाख युरो आहे.हा 21 वर्षीय खेळाडू एएस मोनॕकोकडून पीएसजीकडे आला तेंव्हा 18 कोटी युरोची उलाढाल झाली होती. 2018 च्या विश्वचषक स्पर्धेतही त्याने आपली छाप सोडली होती.

7- एडन हझार्ड

रियाल माद्रिदच्या संघातील एडन हझार्ड 25 लाख युरो दरमहा कमावतो. यंदा त्याची कामगिरी चांगली झाली नसली तरी कमाई भरपूर झाली आहे. यंदाच तो रियालच्या संघात आला आहे. चेल्सीकडून 10 कोटींच्या मोबदल्यात त्याचे स्थानांतरण झाले होते.

6- गेरेथ बेल

रियाल माद्रिदचा गेरेथ बेल हासुध्दा दरमहा 25 लाख युरो कमावतो. 2013 मध्ये तो टॉटेनहॉम हॉटस्परकडून इकडे आला पण प्रशिक्षक झिनेदीन झिदानसोबत त्याचे संबंध सलोख्याचे राहिलेले नाहीत.

5- लुईस सुआरेझ

मेस्सीच्या बार्सिलोना संघातील लुईस सुआरेझची कमाई महिन्याला 29 लाख युरोची आहे. सध्याच्या पिढीतील हा सर्वोत्कृष्ट स्ट्रायकर मानला जातो. 2014 मध्ये तो लिव्हरपूलकडून बार्सिलोनाकडे आला.

4- अंतोईन ग्रिझमान

Antoine Griezmann

बार्सिलोनाच्याच संघातील आंतोइन ग्रिझमानची कमाई महिन्याला 29 लाख युरो आहे. त्याचा बार्सिलोनासाठी हा पहिलाच सिझन होता. त्याच्यासाठी बार्सिलोनाने अॕटलेटिको माद्रिदला 12 कोटी मोजले होते. या 29 वर्षीय खेळाडूने 35 ला लिगा सामन्यात नऊ गोल केले आहेत.

3- नेमार

पॕरिस सेंट जर्मेनचा फाॕरवर्ड नेमार हा 30 लाख युरो दरमहा कमावतो. ब्राझिलचा हा खेळाडू 2017 मध्ये बार्सिलोनाकडून पीएसजीला आला होता तेंव्हा तब्बल 22 कोटी 20 लाख युरोची किंमत लागली होती. या 28 वर्षीय खेळाडूने यंदा 18 सामन्यात 15 गोल केले आहेत.

2- ख्रिस्तियानो रोनाल्डो

cristiano ronaldo

अपेक्षेप्रमाणे ख्रिस्तियानो रोनाल्डो सर्वाधिक कमाईत दुसऱ्या स्थानी आहे. युवेंटसच्या या सुपरस्टारची महीन्याकाठी कमाई 45 लाख युरो आहे. 2018 मध्ये तो रियाल माद्रिदकडून युवेंटसला आला. यंदा सेरी ए मध्ये 33 सामन्यात त्याने 31 गोल केले आहेत.

1- लियोनेल मेस्सी

कमाईच्या बाबतीत सर्वांना मागे टाकून नंबर वन आहे,अर्थातच बार्सिलोनाचा सुपरस्टार लियोनेल मेस्सी.हा गडी महिन्याकाठी तब्बल 83 लाख युरो कमावतो. आता यंदा ला लिगा जिंकण्यात अपयशी ठरल्यावर कारकिर्दीत तो प्रथमच क्लब बदलवेल अशी चर्चा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER