मंत्री यड्रावकर यांची दादागिरी मोडून काढण्याचा उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांचा इशार

Rajendra Patil-Yadravkar-Uday Samant

कोल्हापूर : कुरूंदवाडच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी देऊन शास्वत विकास करू, नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत शिवसेना ताकदीने सामोरे जाईल आणि पालिकेवर भगवा फडकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. शिवसेनेच्या कोट्यातून मंत्रिपद भोगत असलेल्या शिरोळ तालुक्यातील मंत्र्यांची शिवसेना कार्यकर्त्यांच्या विरोधात सुरू असलेली दादागिरी या निवडणुकीत नक्कीच मोडून काढू असा इशारा उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर (Rajendra Patil-Yadravkar) यांना दिला. येथील भालचंद्र थिएटर येथे शिवसेना चैतन्य मेळावा झाला. यावेळी मंत्री सामंत बोलत होते.

यावेळी माजी आमदार उल्हास पाटील, जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, उपजिल्हाप्रमुख मधुकर पाटील, मंगलताई चव्हाण आदींनी भाषणे केली. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी खा. माने म्हणाले, कोरोना आपत्तीसाठी केंद्र सरकारने खासदारांचे निधी गोठवले आहेत. त्यामुळे माझ्या मतदारसंघातील शिरोळ तालुक्याला आपल्याकडून निधी मिळावा, अशी मागणी त्यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER