मराठा आरक्षणाची हाय व्होल्टेज बैठक; मुख्यमंत्र्यांसह दिग्गज नेतेही राहणार उपस्थित

Maratha Reservation

मुंबई : सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) मराठा आरक्षणावर (Maratha Reservation) सुनावणी सुरू आहे. न्यायालयात मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यात आली. या स्थगितीमुळे राज्य सरकारला धक्का बसला आहे. या मुद्द्यावरून सरकारवर जोरदार टीका होत आहे. मराठा आरक्षण टिकवण्याची इच्छाशक्ती सरकारकडे नाही, असा आरोप भाजपा करत आहे.

सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाबाबत सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली आहे. मराठा आरक्षणाविषयी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय न्याय व विधी मंत्री रविशंकर प्रसाद, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले त्याचबरोबर मराठा आरक्षण उपसमितीचे सदस्य तसेच सरकारचे कायदेविषयक सल्लागार आणि तज्ज्ञ  यांच्यासोबत बैठक आहे. ही बैठक रविवारी दुपारी ४ वाजता सह्याद्री अतिथिगृहावर होणार असल्याची माहिती आहे.

बैठकीत आरक्षणाबाबत नेमक्या  काय हालचाली होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या बैठकीतील चर्चेच्या आधारे सरकार सुप्रीम कोर्टात बाजू मांडणार आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित राहिला. काही दिवसांपूर्वी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली. तसे सरकारी भरतीच्या बाबतही वादंग निर्माण चालू आहे. त्यामुळे हा प्रश्न लवकरात लवकर सुटावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER