हायप्रोफाईल वेश्या व्यवसाय अड्ड्यावर छापा; पोलीस निरीक्षकाला अटक

High profile prostitute raid

सांगली : जिल्ह्यातील कर्नाळा रोड येथील हॉटेल रणवीरमधील हायप्रोफाईल वेश्या व्यवसाय (prostitution business) अड्ड्यावर पोलिसांनी आज शुक्रवारी कारवाई केली. दोन पीडित तरुणींची सुटका केली. त्या दोन तरुणींची रवानगी महिला सुधारगृहात केली आहे. पोलीस निरीक्षकाला अटक (Police inspector arrested) झाल्यामुळे पोलीस दलासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस प्रशासनाने, अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार हॉटेलवर कारवाई केली. कारवाईत पोलीस निरीक्षकासह सहा जणांवर अटकेची कारवाई झाली आहे. अटक केलेल्यामध्ये आटपाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांचा समावेश आहे.

हॉटेल मालक राघवेंद्र शेट्टी, हॉटेल मालकाचा भाऊ रवींद्र शेट्टी, हॉटेलचे मॅनेजर राजेश यादव, एजंट शिवाजी वाघळे यांना पोलिसांनी अटक केली. ग्राहक सत्यजित पंडित यालाही अटक झाली आहे. पोलीस अधिकारी मायादेवी काळगावे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली आहे. १०५ व १०७ नंबर खोलीत वेश्या व्यवसाय होत असल्याचे पोलीस कारवाईत पुढे आले आहे. पोलिसांकडील माहितीनुसार, हॉटेल मालक राघवेंद्र व त्यांचा भाऊ रवींद्र हे बाहेरून मुली आणून वेश्या व्यवसायासाठी हॉटेलमध्ये ठेवत. मॅनेजरला, एजंटांनी आणून दिलेल्या मुलींना ग्राहकांकडून पैसे घेऊन त्यांना मुली पुरविण्यास सांगत.

यापैकी एजंट वाघळे हा एका ग्राहकाकडून तीन हजार रुपये घेत असे. त्यातील एक हजार रुपये स्वत:कडे ठेवायचा. एक हजार रुपये हॉटेल व्यवस्थापनाला (मॅनेजर) द्यायचा आणि एक हजार रुपये संबंधित महिलांना देई. आरोपीतील दोघे शेट्टी बंधू, मॅनेजर यादव आणि एजंट वाघळे यांनी संगनमत करून हॉटेलमधील रूमचा कुंटणखान्याप्रमाणे वापर केला. तिथे वेश्या व्यवसाय चालवीत होते. पोलीस प्रशासनाला यासंबंधी माहिती मिळताच त्यांनी गुरुवारी सायंकाळी कारवाईला सुरुवात केली. या कारवाई दरम्यान अरुण देवकर व सत्यजित पंडित हे त्या रूममध्ये ग्राहक म्हणून आढळून आले आहेत, असे पोलिसांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER