हायकोर्टाचा दिलासा, नाशिक महापालिकेतील ‘स्थायी’त शिवसेनेची ताकद वाढली

Shivsena-BJP

नाशिक : नाशिक महापालिकेतील (Nashik municipal corporation) स्थायी समिती सदस्यांच्या मुद्द्यावरुन हायकोर्टाने भाजपला दणका दिला आहे. हायकोर्टाने (Highcourt) दिलेल्या निकालामुळे शिवसेनेला (shivsena)लॉटरी लागली, तर भाजपला धक्का बसला आहे. हायकोर्टाने दिलेल्या आदेशाप्रमाणे तौलनिक संख्याबळानुसार शिवसेनेला एक जागा अधिकची मिळाली आहे.

एक सदस्य कमी झाल्याने स्थायी समितीवर असलेल्या भाजपच्या वर्चस्वाला धक्का बसला आहे. दोन नगरसेवक घटल्याने भाजपचे तौलनिक संख्याबळ आठच असण्याबाबत शिवसेनेने न्यायालयात धाव घेतली हाती. आता या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार असल्याची माहिती भाजपने दिली.

तौलनिक संख्याबळानुसार स्थायी समिती सदस्य नियुक्ती करण्याच्या निर्णयाविरोधात शिवसेनेने हायकोर्टात तक्रार केली होती. तौलनिक संख्याबळाचा विचार करता स्थायी समितीत शिवसेनेचा एक सदस्य वाढला असल्याचा दावा केला जात होता. त्यातच महापौर सतीश कुलकर्णी यांनी गेल्या वर्षी स्थायी समितीवर भाजपच्या आठऐवजी नऊ सदस्यांची नियुक्ती केल्याचा दावा शिवसेनेने केला होता. यानंतर शिवसेना गटनेते विलास शिंदे आणि विरोधी पक्ष नेते अजय बोरस्ते यांनी हायकोर्टात धाव घेतली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER