
कोलकाता: विधानसभेच्या आगामी निवडणुकांचे वातावरण तापलेल्या पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीला ‘जनजागृती’ रथयात्रा काढण्यास मनाई करावी, यासाठी केलेली याचिका कलकत्ता उच्च न्यायालयाने (Calcutta High Court) फेटाळली.
त्याच न्यायालयात वकिली करणाºया रमाप्रसाद सरकार या वकिलाने ही याचिका केली होती. अशा रथयात्रा काढल्या गेल्या तर आटोक्यात येत असलेली कोरोनाची साथ पुन्हा फोफावेल. तसेच आधीच राजकीय वातावरण तापलेले असताना अशा रथयात्रांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती आणखी ढासळेल, असे सरकार यांचे म्हणणे फेटाळले.
न्या. राजेश बिंदल व न्या. अनिरुद्ध रॉय यांच्या खंडपीठाने ही याचिका प्रामुख्याने दोन कारणांवरून फेटाळली. एक, याचिकाकर्ते राज्यातील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस या पक्षाचे सदस्य आहे. त्यामुळे त्यांची ही याचिका विशुद्ध जनहिताची नव्हे तरराजकारणाने प्रेरित होऊन केलेली याचिका आहे. एका निवडणुकीच्या काळात्पक्षाने दुसर्या पक्षाच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्यासाठी केलेली अशी याचिका ऐकणे योग्य होणार नाही.
दुसरे असे की, अशाच मागणीची निवेदने पोलीस व सरकारला देण्यात आल्याचे याचिकाकर्ते म्हणतात. परंतु त्या अधिकाºयांना त्या निवेदनांवर विचार करून निर्णय घेण्यासाठी पुरेसा वेळही न देता याचिकाकर्त्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे.
राज्याच्या पाच प्रशासकीय विभागांच्या मुख्यालयांतून या रथयात्रा एकाच वेळी सुरु करून त्या कोलकत्यात आणायच्या व वाटेत संपूर्ण राज्य सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या कुशासनाविरोधातील प्रचाराने पिंजून काढायचे, अशी बाजपाची योजना आहे.
-अजित गोगटे
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला