सुशांतच्या बहिणीकडून दाखल याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाचा नकार

Sushant Singh Rajput-Mumbai High Court

मुंबई : ‘सुशांतसिंह राजपूत याच्या बहिणी प्रियांका सिंग व मीतू सिंग यांनी केलेल्या फौजदारी रिट याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिला आहे. तसेच पुढील सुनावणी १३ ऑक्टोबर रोजी घेणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

सुशांतला त्याच्या बहिणींनी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनविना औषधे दिली, असा आरोप करत अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिनं केला आहे. रियानं त्यांच्याविरोधात एफआयआर नोंदवला आहे. तो रद्द करण्याची विनंती करणारी फौजदारी रिट याचिका दोघींनी न्यायालयात केली आहे. ‘याविषयी सध्या पोलिसांचा तपास सुरू असल्यानं आम्ही त्यात हस्तक्षेप करू इच्छित नाही. त्यामुळं या टप्प्यावर तातडीनं सुनावणी घेण्याचे कारण दिसत नाही’, असं नमूद करून तातडीच्या सुनावणीस उच्च न्यायालयानं नकार दिला. तक्रारदार रिया चक्रवर्तीच्या वकिलांसह एफआयआरविषयी तपास करत असलेल्या सीबीआयला एक आठवड्यात उत्तर दाखल करण्यासाठी मुदत देऊन उच्च न्यायालयाने सुनावणी पुढील मंगळवारी ठेवली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER