हायकोर्टातील न्यायाधीश, वकिलांना कोरोनोची लस

Maharashtra Today

मुंबई: मुंबई उच्च न्यायालयाचे मुंबईतील न्यायाधीश व त्यांच्या पत्नी / पतीला २ ते ४ एप्रिल या दरम्यान कोरोना  प्रतिबंधक लस टोचण्यात येणार आहे.

मुख्य न्यायाधीश न्या. दीपंकर दत्ता(Dipankar Datta) यांच्या अध्यक्षतेखली झालेल्या  प्रशासकीय न्यायाधीश समितीच्या बैठकीत हा निर्णय झाल्याचे कळते. याच वेळी उच्च न्यायालयातील वकील, त्यांच्या पत्नी/ पती आणि त्यांच्याकडे काम करणारे कर्मचारी यांचेही लसीकरण केले जाणार असल्याचेही कळते. ज्यांचे वय ४५ वर्षांहून अधिक आहे अशांनाच लस टोचण्यात येईल.

बृहन्मुंबई महापालिकेने शहरात १७४ कोरोना लशीकरण केंद्रे सुरु केली आहेत. त्यातीलच काही केंद्रांच्या कर्मचाºयांना उच्च न्यायालयात आणून हे लशीकरणे केले जाईल, असेही समजते. उच्च न्यायालयाच्या नागपूर व औरंगाबाद खंडपीठातील न्यायाधीश व वकील आणि कनिष्ठ न्यायालयांमधील न्यायाधीशांच्या लशीकारणाचा नक्की कार्यक्रम मात्र अद्याप ठरलेला नाही.

उच्च न्यायालयाने सुमारे १० महिन्यांनंतर अलिकडेच प्रकरणांची न्यायदालनांमध्ये प्रत्यक्ष सुनावणी सुरू केली. परंतु कोरोनाचा जोर पुन्हा वाढत असल्याचे दिसत असल्याने न्यायालयाने ‘हायब्रिड’ पद्धतीने (म्हणजे अंशत: प्रत्यक्ष व अंशत: व्हिडिओ कॉन्परन्सिंगने) करावी, असे पत्र ‘बॉम्बे बार असोसिएशन’ने मुख्य न्यायाधीशांना पाठविले होते. प्रशाससकीय न्यायाधीश समितीच्या बैठकीत त्या अनुषंगानेही विचार झाला. पण निर्णय ५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात आले. नागपूर व औरंगाबाद खंडपीठांनी १८ मार्चपासून पुन्हा सर्व प्रकरणांंची सुनवमी ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’ने सुरु केली आहे.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button