कंगना राणावतच्या याचिकेवर हायकोर्टाचा निकाल राखीव

Kangana Ranaut - Bombay High Court

मुंबई : बॉलिवूडची (Bollywood) अभिनेत्री कंगना राणावत (Kangana Ranaut) हिने, तिच्या बंगल्याचे काही काम बेकायदा असल्याचे सांगत बृहन्मुंबई महापालिकेने सुरु केलेल्या पाडकामाविरुद्ध केलेल्या  याचिकेवरील निकाल मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) सोमवारी राखून ठेवला.

याचिकेवर गेले अनेक दिवस सुरु असलेली प्रदीर्घ सुनावणी संपल्यानंतर न्या. एस. जे. काथावाला व न्या. रियाझ छागला यांनी ‘आम्ही निकाल राखून ठेवत आहोत’, असे जाहीर केले. डॉ. वीरेंद्र सराफ व अ‍ॅस्पी चिनॉय या ज्येष्ठ वकिलांनी अनुक्रमे कंगना व महापालिकेच्या वतीने युक्तिीवाद केला. तोंडी युक्तिवाद संपल्यावर त्यांनी त्याचे लेखी टिपणही, न्यायालयाच्या सोयीसाठी सादर केले.

कंगना हिने वांद्रे येथील पाली हिलवरील तिच्या राहत्या बंगल्याच्या रचनेत, परवानगी न घेता मोठे फेरबदल केले, अशी नोटीस महापालिकेने आधी दिली व नंतर ९ सप्टेंबर रोजी ते जास्तीचे बांधकाम पाडण्यास सुरुवात केली. त्याच दिवशी कंगनाने न्यायालयात याचिका केली व न्यायालयाने लगेच पाडकामाला स्थगिती दिली.

आपण राज्यातील सत्ताधाºयांवर टीका करणारी टष्ट्वीट केली म्हणून शिवसेनेची सत्ता असलेल्या महापालिकेने ही कारवाई आकसाने केली, असा कंगना हिचा मुख्यत: आरोप होता. न्यायालयानेही, एरवी  राजरोसपणे होणाºया अनधिकृत बांधकामांकडे काणाडोळा करणाºया महापालिकेने या प्रकरणात एवढ्या तत्परतेने कारवाई करावी, याविषयी आश्चर्य व्यक्त केले. सुरुवातीस महापालिकेने वेळ मागितला. परंतु, अर्धवट पाडलेले राहते घर तसेच ठेवून आम्ही सुनावणी तहकूम करू शकत नाही, असे सांगून न्यायालयाने त्यास नकार दिला व तातडीने सुनावणी घेऊन ती पूर्ण केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER