पालकमंत्र्यांचे छुपे गुण आणि अजितदादा

Satej Patil - Ajit Pawar

कोल्हापूर :- आताच तुमच्याबद्दल एक कमेन्ट मी ऐकली, अजून एक गुण आम्हाला समजला, असे खासदार सुप्रिया सुळे  (Supriya Sule) पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांना उद्देशून म्हणाल्या. त्यावर सतेज पाटील अत्यंत उशार आहेत. त्यांच्या हुशारीबद्दल दस्तूरखुद्द उपमुख्यमंत्री अजित पवारच (Ajit Pawar) अधिक सांगतील, अशी टोलेबाजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी केली. गुरुवारी रात्री शासकीय विश्रामगृह येथे नेत्यांच्या या रंगलेल्या कलगीतुऱ्याची कार्यकर्त्यांत मात्र तर्कवितर्कासह चर्चा रंगली.

राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. रात्री ९ वाजता शासकीय विश्रामगृह येथे कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी झाल्यावर पवार पाहुण्याकडे निघाले. त्याच वेळी मुंबईहून बेळगाव विमानतळ आणि कोल्हापूर असा प्रवास करून पालकमंत्री सतेज पाटील आणि खा. सुप्रिया सुळे तिथे पोहचले. त्यांची आणि पवारांची धावती भेट झाली. पवारांच्या वाहनांचा ताफा निघून जात असताना सतेज पाटील एका बाजूला कार्यकर्त्यांसमवेत उभे होते.

दरम्यान, सुप्रिया सुळे आणि हसन मुश्रीफ यांच्यासह सुमारे ५० हून अधिक कार्यकर्ते गप्पा मारत होते. सतेज पाटील कुठे आहेत? असे सुळे यांनी विचारले. सतेज पाटील त्यांच्या दिशेने येत असतानाच सुळे यांनी मुंबईपासून कोल्हापूरपर्यंत सतेज माझे केअरटेकर होते, असे सांगितले. त्यावर मुश्रीफ म्हणाले, ते खूप हुशार आहेत. दरम्यान, पाटील येताच सुळे यांनी सतेज आपल्याबद्दल आत्ताच मला एक कॉम्प्लीमेन्ट ऐकायला मिळाली असे सांगितले. पुन्हा मुश्रीफ म्हणाले, हे किती हुशार आहेत, ते दादांना (अजित पवार) विचारा. आमच्यापेक्षा तेच अधिक सांगतील. नेत्यांच्या संवादाने एकदम हशा पिकला आणि उशिरापर्यंत उलटसुलट चर्चाही रंगली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER