बंगालमधील रॅलींबाबत सर्वपक्षीय नेत्यांना केले ‘हे’ आवाहन; राहुल गांधींचा मोठा निर्णय

Rahul Gandhi

नवी दिल्ली : वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर काँग्रसे नेते राहुल गांधी यांनी मोठा निर्णय घेतला आहे. राहुल गांधी यांनी पश्चिम बंगालमधील राहिलेल्या टप्प्यातील जागांसाठीच्या प्रचारसभा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. राहुल गांधीनी प्रचारसभा रद्द करण्यासोबत इतर पक्षाच्या राजकीय नेत्यांनादेखील मोठ्या सभा घेण्यापूर्वी विचार करण्याचे आवाहन केले आहे.

याबाबत राहुल गांधी यांनी ट्विट केले आहे. देशात गेल्या २४ तासांत २ लाख ६१ हजार ५०० करोनाबाधित आढळले आहे. राहुल गांधी यांनी सर्व राजकीय नेत्यांना अशा परिस्थितीत गर्दी करत प्रचारसभा घेण्यासंबंधी विचार करण्याचे आवाहन केले आहे. पश्चिम बंगालमध्ये शनिवारी पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडले. पाचव्या टप्प्यात एकूण ७९.१८ टक्के मतदानाची नोंद झाली. यानंतर राहुल गांधी यांनी कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता महत्वाचा निर्णय घेतला आहे.

राहुल गांधी यांनी सांगितले आहे की, “कोरोनाची स्थिती लक्षात घेता मी पश्चिम बंगालमधील माझ्या सर्व प्रचारसभा रद्द करत आहे.सद्यस्थितीत मोठ्या संख्येने जाहीर सभा घेतल्याने होणाऱ्या दुष्परिणामांवर सखोल विचार करण्याचा सल्ला मी सर्व राजकीय नेत्यांना देतो.”

त्याचबरोबर, काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी यांनी भाजप नेत्यांनी मोठी सभा घेतली असल्याची वारंवार टीका केली होती. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीका करण्यात आली. यावेळी काँग्रेस नेतेही सभा घेत होते. दरम्यान, राहुल गांधी यांनी सर्व सभा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर इतर काँग्रेस नेत्यांकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button