खलनायिका बनणाऱ्या नायिका

Kaun - FIDA - Haseena Parkar

चित्रपटात नायिका म्हणून काम करणारी रिया चक्रवर्ती ड्रग्सच्या व्यापारात अडकल्याने खलनायिका म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. अर्थात तिच्यावरचे आरोप अजून सिद्ध व्हायचे आहेत परंतु पडद्यावरील ही नायिका वास्तवात खलनायिका झाली आहे. यापूर्वी इंद्राणी मुखर्जीलाही (Indrani Mukerjee) मुलीच्या हत्या केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली असून ती तुरुंगाची हवा खात आहे. वास्तवात नायिका खलनायिका होता असतानाच रुपेरी पडद्यावरही खलनायिका बनणाऱ्या नायिकांची आठवण होणे स्वाभाविकच आहे. पण एक लक्षात घ्या मला व्हॅम्प म्हणायचे नाही तर ज्याप्रमाणे चित्रपटात खलनायक असतो तशाच पद्धतीने काही नायिकांनी खलनायिकेची भूमिका पडद्यावर साकारली असून यात डॉनपासून दहशतवाद्यापर्यंत अनेक भूमिकांचा समावेश आहे.

Urmila Matondkarनायिका खलनायिका बनल्याचा विचार करताना लगेचच उर्मिला मातोंडकर डोळ्यासमोर येते. रामगोपाल वर्मा निर्मित आणि दिग्दर्शित कौनमध्ये उर्मिलाने खलनायिकेची भूमिका साकारली होती. मनोविकार असलेली उर्मिला एका पाठोपाठ एक मर्डर करते. तिचे हे रूप फारच भयावह वाटले होते. चित्रपटाच्या सेटवर तिच्याशी गप्पा मारताना तिनेही ही अत्यंत वेगळी भूमिका असून प्रेक्षकांना घाबरवणारी असेल असे म्हटले होते आणि खरोखरच तसे झालेही होते. त्यानंतर मात्र उर्मिलाने अशा प्रकारची भूमिका केली नाही.

Ittefakखरे तर नायिकेने खलनायिका बनण्याची सुरुवात 1969 मध्येच झाली होती. राजेश खन्ना आणि नंदा अभिनीत प्रचंड यशस्वी झालेल्या चित्रपटात प्रथमच नायिकेला म्हणजेच नंदाला खलनायिका बनवण्यात आले होते. पैशांसाठी नंदा राजेश खन्ना हत्येच्या आरोपात फसवताना यात दाखवले होते. त्यानंतर मात्र अनेक वर्ष नायिका खलनायिका झाली नव्हती.

आशिकीमुळे लोकप्रिय झालेल्या अनु अग्रवालनेही खलनायिकेची भूमिका साकारली होती. केले होते. एका इंग्रजी चित्रपटावर आधारित खलनायिका हेच नाव असलेल्या चित्रपटात अनु अग्रवाल एका आईला तिच्या बाळापासून दूर करण्यासाठी कशी कारस्थाने रचते, बाळाच्या आईला मारण्यासाठी कसे प्रयत्न करते ते अंगावर शहारे येईल याप्रकारे दाखवले होते. अनु अग्रवालने खूपच चांगली भूमिका साकारली होती.

Fida 2004 Wallpapers | shahid-kapoorkareena-kapoor-16 - Bollywood Hungamaकाही वर्षांपूर्वी आलेल्या फरदीन खान, करीना कपूर आणि शाहिद कपूरचा फिदा चित्रपट आला होता. या चित्रपटात करीनाने शाहिदला फसवणाऱ्या खलनायिकेची भूमिका साकारली होती. फिदाच्या वेळी आपल्या भूमिकेबद्दल बोलताना करीनाने म्हटले होते, नायिक नेहमी चांगली, सुशील आणि आदर्श अशीच असायला हवी असते. त्यामुळे अशा प्रकारची भूमिका साकारणे अवघड असते. खलनायिकेचे गुण दाखवले तरच प्रेक्षकांना आमची भूमिका आवडेल परंतु हे सोपे काम नाही. करीनाने त्यानंतर टशनमध्येही अशाच प्रकारची भूमिका साकारली पण प्रेक्षकांना दोन्ही चित्रपटात तिचे काम आवडले नाही.

ऐश्वर्या राय ने खाकीमध्ये तर तब्बूने प्रथम माचिसमध्ये खलनायिकेची भूमिका साकारली होती. दहशतवादी महिलेची भूमिका तब्बूने साकारली होती. परंतु ती तिच्यावर झालेल्या अन्यायामुळे खलनायिका झाल्याचे दाखवले होते. परंतु दोन वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या अंधाधुनमध्येही तब्बू खलनायिका झाली होती. आणि ही भूमिका पूर्णपणे खलनायिकेचीच होती आणि तब्बूने यात कमाल केली होती.

Bollywood Is Yet To Come Up With A Thriller As Shocking As Gupt & You Can't  Deny That!अनकही चित्रपटात ईशा देओलने खलनायिकेची भूमिका साकारली होती आणि तिला उत्कृष्ट खलनायिकेचा पुरस्कारही मिळाला होता. ईशा एका मागोमाग एक हत्या करीत जाताना या चित्रपटात दाखवण्यात आले होते. असेच गुप्त चित्रपटातही दाखवण्यात आले होते. बॉबी देओल, मनीषा कोईराला अभिनीत या चित्रपटात काजोलने खलनायिकेची भूमिका साकारली होती.  आपल्या प्रेमीला प्राप्त करण्यासाठी  ती हत्या करीत असल्याचे यात दाखवण्यात आले होते. तिची ही भूमिका खूपच गाजली होती.

Haseena Parkar teaser: B-Town is in love with 'intense and gritty' Shraddha  Kapoor - Movies Newsनवीन नायिका श्रद्धा कपूरने कुख्यात डॉन दाऊदची बहिण हसीनच्या जीवनावर आधारित चित्रपटात हसीनाची भूमिका साकारली होती. इशा कोप्पीकरनेही कयामत- सिटी अंडर थ्रेटमध्ये दहशतवादी महिलेची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी तिला उत्कृष्ट खलनायिकेच्या नामांकनात स्थानही मिळाले होते. यानंतर इशाने रामगोपाल वर्मा द्वारा निर्मित आणि ललित मराठे द्वारा दिग्दर्शित शबरीमध्ये मुंबईतील पहिल्या महिला डॉनची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी इशाचे खूपच कौतुक झाले होते. खरे तर आणखीही काही नायिकांनी अशा भूमिका साकारल्या असतील परतु या लगेचच आठवणाऱ्या काही भूमिका आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER