चाळीशीनंतरही आई झालेल्या नायिका

गेल्या वर्षी कोरोना काळात करीना कपूर (Kareena Kapoor) आणि सैफ अलीने (Saif Ali) चाहत्यांना सुखद बातमी दिली होती. जाहीर पत्रक काढून करीना गरोदर असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. त्या दिवसापासून ते कालपर्यंत म्हणजे रविवारपर्यंत करीनाने दुसऱ्या मुलाला जन्म देईपर्यंत करीना जवळ जवळ रोजच चर्चेत होते. सैफ चौथ्यांदा बाप झाला असून करीना दुसऱ्यांदा आई झाली आहे. सोशल मीडियावर करीना तिच्या बेबी बम्पपासून ते आई बबिताकडून डोक्याला मालिश करण्यापर्यंतचे फोटो शेअर करीत होती. फोटोग्राफर रोज त्यांच्या घराबाहेर जाऊन फोटो काढण्याचा प्रयत्न करीत होते. गरोदर असतानाही गरोदरपणाचाही करीनाने बिझनेससाठी वापर केला होता. गरोदर स्त्रियांसाठी असलेल्या उत्पादनांच्या जाहिराती तिने स्वीकारल्या होत्या. एकूणच करीनाने गरोदरपणाचा सोहळाच केला होता. यात सगळ्यात महत्वाचे म्हणजे करीनाचे वय 40 च्या वर असतानाही तिने हे सगळे केले. बॉलिवूडमध्ये केवळ करीनाच नाही तर अशा अनेक नायिका आहेत ज्यांनी चाळीशीनंतर आईपणाचा अनुभव घेतलेला आहे. यापैकी काही जणींनी वय लक्षात घेऊन सरोगसीची मदत घेऊनही आईपणाचा आनंद मिळवला आहे.

करीनाची सवत म्हणजेच सैफची पहिली पत्नी अमृता सिंह (Amruta Singh) नेही वयाच्या चाळीशीनंतर मुलाला जन्म दिला होता. अमृता सैफपेक्षा वयाने मोठी असतानाही सैफचे तिच्यावर प्रेम जडले होते आणि दोघांनी कोणालाही न कळवता 1991 मध्ये लग्न केले होते. लग्नाच्या चार वर्षानंतर 1995 मध्ये अमृताने सारा (Sara Ali Khan) ला जन्म दिला होता. त्यानंतर सहा वर्षानंतर 2001 मध्ये इब्राहिम (Ibrahim) ला जन्म दिला होता. त्यावेळी अमृताचे वय 43 वर्ष होते. मात्र इब्राहिम तीन वर्षांचा झाला असतानाच अमृता आणि सैफने घटस्फोट घेतला होता. त्यानंतर सैफने करीनाशी लग्न केले आणि आता त्याला करीनापासून दोन मुले झाली आहेत.

गोविंदाचा ‘आंखें’ सिनेमा तुम्हाला आठवत असेलच. या सिनेमात नायिकेची भूमिका रागेश्वरीने (Rageshwari) केली होती. तिचे पूर्ण रागेश्वरी लुंबा. ती केवळ अभिनेत्रीच होती असे नाही तर गायिकाही होती. सिनेइंडस्ट्री सोडल्यानंतर रागेश्वरी संसारात मग्न झाली होती. 2016 मध्ये रागेश्वरीने एका मुलीला जन्म दिला त्यावेळी ती 41 वर्षांची होती. बाळंतपणानंतर रागेश्वरीने तिच्या गरोदरपणाचे अनुभवही शेअर केले होते.

अमिताभ बच्चनचा (Amitabh Bachchan) 2003 मध्ये आलेला एक अत्यंत बकवास आणि सुपर फ्लॉप ठरलेला सिनेमा म्हणजे ‘बूम’ याच सिनेमातून कॅटरीना कैफने (Katrina Kaif) बॉलिवूडमध्ये एंट्री केली होती. याच सिनेमात पद्मा लक्ष्मी (Padma Laxmi) नावाचीही एक अभिनेत्री होती. सिनेमात तिने मॉडेलची भूमिका केली होती. पद्मा लक्ष्मीने अमेरिकन उद्योगपती एडम डेलशी लग्न केले आणि 2010 मध्ये मुलगा कृष्णाला जन्म दिला. त्यावेळी पद्मा लक्ष्मी 40 वर्षांची होती.

याशिवाय सरोगसीच्या माध्यमातूनही काही नायिकांनी चाळीशीनंतर मुलांना जन्म दिला आहे. यात फरहा खानचे (Farah Khan) नाव आवर्जून घ्यावे लागेल. बॉलिवूडमध्ये फरहा खान कोरियोग्राफर आणि दिग्दर्शक म्हणून ओळखली जाते. फरहाने तिच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या शिरीष कुंदरसोबत लग्न केले. त्यानंतर 43 व्या वर्षी फरहाने आयव्हीएफच्या माध्यमातून एक, दोन नव्हे तर तीन मुलांना जन्म दिला होता.

शिल्पा शेट्टीने (Shilpa Shetty) बिझनेसमन राज कुंद्राशी लग्न केले. त्यानंतर शिल्पाने 2012 मध्ये शिल्पाने मुलगा वियानला जन्म दिला होता. त्यानंतर शिल्पाने आणखी एकदा आई बनण्याचा निर्णय घेतला. मात्र यावेळी तिने यासाठी सरोगसीचा वापर करण्याचे ठरवले. त्याप्रमाणे 2020 मध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी शिल्पाने दुसऱ्यांदा आई झाल्याची बातमी दिली होती. शिल्पा शेट्टीने सरोगसीच्या माध्यमातून मुलीला जन्म दिला तेव्हा ती 44 वर्षांची होती.

बॉलिवूडमध्ये जम्पिंग जॅक म्हणून ओळख असलेल्या अभिनेता जितेंद्रची (Jitendra) मुलगी एकताने (Ekta Kapoor) छोट्या पडद्यावर मालिकांची निर्मिती करून टीव्हीची महाराणी ही बिरुदावली मिळवली होती. एकताने लग्न केले नाही. पण तिला मुलांची आवड होती. एकताचा भाऊ तुषार कपूरनेही लग्न केले नाही पण तो सरोगसीच्या माध्यमातून एका मुलाचा बाप झाला. ते पाहून एकतानेही वयाच्या 44 व्या वर्षी सरोगसीच्या माध्यमातून आईपणाचा आनंद घेतला. 2019 मध्ये एकताने सरोगसीच्या माध्यमातून एका मुलाला जन्म दिला. एकताने मुलाचे नाव रवी ठेवले. जीतेंद्र यांचे खरे नाव रवीच आहे.

कृष्णा अभिषेक (Krishna Abhishek) छोट्या पडद्यावरील यशस्वी कॉमेडियन म्हणून ओळखला जातो. कृष्णाने त्याच्यापेक्षा वयाने 12 वर्ष मोठ्या असलेल्या बोल्ड अभिनेत्री कश्मीरा शाह (Kashmira Shah) बरोबर केले होते. कश्मीराने 2017 मध्ये सरोगसीच्या माध्यमातून जुळ्या मुलांना जन्म दिला होता. त्यावेळी कश्मीराचे वय 45 होते.

1997 मध्ये मिस वर्ल्डचा मुकुट जिंकलेल्या डायना हेडन (Diana Hayden) ने वयाच्या 43 व्या वर्षी आई बनण्याचा आनंद मिळवला होता. मात्र यासाठी तिने सरोगसीची मदत घेतली नव्हती तर एग फ्रीजिंग टेक्निकची मदत घेतली होती. डायनाने मुलीला जन्म दिला आणि तिचे नाव आर्या ठेवले. मुलीच्या जन्माच्या 8 वर्षांपूर्वीच डायनाने तिच्या अंडाशयातील अंडी फ्रीज करून ठेवली होती. आणि त्याच टेक्निकने तिने मुलीला जन्म दिला होता.

शाहरुख खान (Shahrukh Khan) ची पत्नी गौरी खान (Gauri Khan) नेही दोन मुले झाल्यानंतरही चाळीशीनंतर सरोगसीच्या माध्यमातून पुन्हा एकदा आईपणाचा आनंद घेतला होता. अबरामला जन्म दिला तेव्हा गौरी 42 वर्षांची होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER