हरमन बावेजाचे आज लग्न

Maharashtra Today

प्रियांका चोप्रा आणि हरमन बावेजा (Herman Baweja)यांच्यातील प्रेम प्रकरणाची माहिती आम्ही तुम्हाला अगोदर दिलीच होती. मात्र प्रियांका चोप्राने निक जोनासबरोबर लग्न केल्यानंतर हरमन बावेजानेही संसार थाटण्याचा विचार केला होता. त्याचे साशा रामचंदानीसोबत लग्न होणार असल्याची बातमीही आम्ही तुम्हाला दिली होती. आज हरमन बावेजा आणि साशा रामचंदानी लग्नाच्या बेडीत अडकणार असून त्यांच्या लग्नाला बॉलिवूडमधील मोठे कलाकार उपस्थित राहाणार आहेत. या दोघांचा मेहंदी समारोह काल पार पडला असून याला शिल्पा शेट्टीच्या पतीने राज कुंद्राने हजेरी लावली होती. राज कुंद्रानेच या मेहंदी समारोहाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

प्रियांका आणि हरमन एकमेकांच्या प्रेमात होते तेव्हा हरमनच्या वडिलांनी या दोघांसाठी काही सिनेमाची निर्मिती केली होती. लव स्टोरी २०५० सिनेमात या दोघांनी एकत्र काम केले होते. हा साय फाय सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरफ्लॉप झाला होता. त्यानंतर प्रियांकानेही हरमनची साथ सोडली. हरमन बावेजा वडिलांचा व्यवसाय सांभाळत होता. प्रियांकाने निक जोनासबरोबर लग्न केल्यानंतर हरमननेही लग्नाचा विचार सुरु केला होता. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये हरमनचा साशा रामचंदानीसोबत साखरपुडा झाला होता. याचे फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले होते. अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या पतीने राज कुंद्राने हरमनच्या लग्नाचे अपडेट्स सोशल मीडियावर शेअर केले असून लग्नाला जाणार असल्याचेही त्याने म्हटले आहे.

राज कुंद्राने विमानातील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत हरमन, त्याची होणारी पत्नी साशा, राज कुंद्रा, आमिर अली, आशिष चौधरी दिसत आहे. राज कुंद्राने या फोटोसोबत लिहिले आहे, ‘आणि आम्ही निघालो, अखेर हरमनचे लग्न होत आहे.’

याशिवाय राज कुंद्राने एक व्हीडियोही शेअर केला असून यात हरमन बावेजा डांस करताना दिसत आहे. कोरोना काळ असल्याने हरमनच्या या लग्नात फक्त ५० निमंत्रितच उपस्थित राहाणार आहेत. लग्नानंतर हरमन मुंबईत एक भव्य रिसेप्शन आयोजित करणार होता. पण कोरोनामुळोे रिसेप्शन त्याने रद्द केले आहे.

हरमन आणि साशाला त्यांच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER