असे आहे Koo App; Download आणि खास फीचर्स घ्या जाणून

Koo App

कू ( Koo ) हे स्वदेशी अ‍ॅप सध्या नेटीजन्समध्ये खूप चर्चेत आहे. याचे युजर्स रोज मोठ्या संख्येत वाढत आहेत. सर्वाना याबद्दल माहिती मिळवायची उत्सुकता आहे. koo ची सोपी आणि नेटीजन्सना लगेच समजणारी ओळख म्हणजे ते ट्वीटर (Twitter) सारखे संवादी अ‍ॅप आहे.

Koo १० महिन्यायापूर्वी भारतात उपलब्ध झाले आणि मोठ्या संख्येत अनेक युजर्सने ते डाऊनलोड केले. यावर फोटो, व्हिडिओ, ऑडिओ शेअर करता येतात. ट्वीटर प्रमाणे एकमेकांशी खाजगी संभाषणासाठी डीएम (DM) देण्यात आला आहे.

अनेक सरकारी मंत्रालये, विभागाकडून Koo अ‍ॅप वर अकाऊंट्स बनवली जात आहेत त्यामुळेही koo चे यूजर वेगाने वाढत आहेत. पण, ज्यांना koo बद्दल अजून माहिती घेण्याची उत्सुकता आहे त्यांनी हे वाचावे.

koo ट्वीटर (Twitter) सारखा ‘मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म’ आहे. यूजर आपल्या आवडी व विषयानुसार तयावे व्यक्त होऊ शकतात. यावर फोटो, व्हीडीओ, ऑडिओ शेअर करू शकतात.

संवादासाठी हिंदी, मराठी, बंगाली, तमीळ, मल्याळम, कन्नड, पंजाबी भाषांचा पर्याय आहे. कॅरेक्टर लिमिट ४०० आहे. ६० सेकंद (१ मिनिटाचा ) पर्यंतचा व्हिडिओ अपलोड करू शकता.

Koo app ने ऑगस्ट २०२० मध्ये भारत सरकारकडून आयोजित Aatmanirbhar App Challenge जिंकले आहे. या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची निर्मिती Aprameya Radhakrishna आणि Mayank Bidawatka यांनी मार्च २०२० मध्ये केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ च्या एका कार्यक्रमामध्ये देशवासियांना आवाहन केले आहे, हे उल्लेखनीय.

फीचर्स

कू अ‍ॅप भारतीय भाषांना देखील सपोर्ट करते. हिंदी, मराठी, बंगाली, तमिळ, मल्याळम, कन्नड, पंजाबी भाषेला देखील सपोर्ट करते. Koo डाऊनलोड साठी गूगल प्ले स्टोअर किंवा अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअर वर उपलब्ध आहे. आयफोन किंवा अ‍ॅन्ड्रॉईड डिव्हाईस मध्ये ते सहज डाऊनलोड करून वापरता येते. Koo डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा; ; अ‍ॅपल युजर्सना या डिरेक्ट लिंक वर हे अ‍ॅप डाऊनलोडसाठी मिळू शकते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER