इथं ईडीच्या नोटीस दिल्या जातात ; शिवसैनिक संतापले, भाजप कार्यालयाबाहेर लावले होर्डिंग!

Shiv Sena - ED - BJP Office Mumbai

मुंबई : पीएमसी बँकेप्रकरणातील (PMC Bank) आर्थिक व्यवहाराप्रकरणी शिवसेना (Shiv Sena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या पत्नी वर्षा राऊत (Varsha Raut) यांना ईडीने नोटीस बजावली आहे. यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसैनिकांनी आपल्या जुन्या स्टाईलप्रमाणे ईडी कार्यालयानंतर आता थेट भाजपच्या कार्यालयाबाहेर (BJP Office Mumbai) होर्डिंग ठोकले आहे.

शिवसैनिकांनी मुंबईतील भाजप प्रदेश कार्यलयाबाहेर सोमवारी रात्री होर्डिंग लावले आहे. ED येथे भाजप विरोधी लोकप्रतिनिधींना नोटीस दिल्या जातात, अशा आशयाचे होर्डिंग भाजप मुख्यलायाबाहेर लावण्यात आलेत. यामुळे आता पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना मुंबईच्याय रस्त्यांवर पहायला मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान सोमवारी दुपारी शिवसैनिकांनी मुंबईतील ईडीच्या कार्यालयाचे नावच बदलून टाकले. ईडीच्या कार्यालयावर हे ‘भाजप प्रदेश कार्यालय’ असे सांगत बॅनरच लावले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER