मुलाला गायब केल्याचा श्वेता तिवारीवर तिच्या पतिचा आरोप

Shweta Tiwari

अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) आणि तिचा पति अभिनव कोहली यांच्यातील संबंध खूपच टोकाला गेलेले आहेत. त्यामुळेच श्वेता तिवारी आपल्या दोन्ही मुलांसह अभिनवला सोडून वेगळी राहू लागली आहे. काही महिन्यांपूर्वी श्वेताने पति अभिनवने (Abhinav) तिला आणि मुलीला मारहाण केल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये केली होती. पोलिसांनी अभिनवला अटकही केली होती. आता अभिनवने मुलगा रेयांशला गायब केल्याचा आरोप श्वेतावर लावला आहे. श्वेताना माझा फोन नंबरही ब्लॉक केला असून ती फोनही घेत नाही असेही अभिनवने म्हटले आहे.

अभिनवने सांगितले, श्वेताला जेव्हा कोरोनाची लागण झाली होती आणि त्यानंतर जेव्हा ती पुन्हा शूटिंग करू लागली होती तेव्हा मी आमच्या मुलावर लक्ष ठेवत होतो. परंतु 25 ऑक्टोबरपासून श्वेता मला मुलाला भेटू देत नाही. माझा फोनही घेत नाही. माझा मुलगा कुठे आहे याची कोणतीही माहिती मला मिळत नसल्याने तिने मुलाला लपवून ठेवले आहे असे वाटते. मी श्वेताच्या घरीही गेलो होतो परंतु तेथेही कोणीही मला भेटले नाही. श्वेता शूटिंग करीत असलेल्या सेटवरही मी गेलो होतो परंतु तेथेही मुलगा दिसला नाही असेही अभिनवने सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER