हनीमूनच्या वेळी करिश्माच्या नवऱ्याने केला होता तिचा सौदा!

Karishma Kapoor - Sanjay Kapoor

करिश्मा कपूरने (Karishma Kapoor) दिल्लीतील उद्योगपती संजय कपूरसोबत (Sanjay Kapoor) लग्न केल्याने सगळ्यांनाच आश्चर्य वाटले होते. संजय कपूरचे अगोदर लग्न झालेले होते परंतु तो पत्नीपासून दूर झाला होता. मात्र बॉलिवूडमध्ये (Bollywood) प्रचंड यशस्वी करिअर करणाऱ्या करिश्माचे वैवाहिक संबंध मात्र यशस्वी होऊ शकले नाही. पति आणि सासू सासऱ्यांना कौटुंबिक हिंसाचार केल्याचा आरोप करिश्माने लावला आणि घटस्फोट घेतला. सध्या करिश्मा आपल्या मुलांसोबत मुंबईतच राहाते. मात्र करिश्मा तिच्या आयुष्यातील हा काळा पट विसरू शकलेली नाही.

एका मुलाखतीत करिश्माने सांगितले, लग्न झाल्यापासूनच सासरच्यांनी तिचा छळ करण्यास सुरुवात केली होती. लग्न झाले आणि आयुष्यच उद्धवस्त झाले असे करिश्मा सतत म्हणत असते. करिश्माच्या म्हणण्यानुसार लग्न झाल्यानंतर लगेचच पति संजय कपूर आणि तिचे सासू सासरे तिला मारहाण करीत असत. एवढेच नव्हे तर करिश्मा आणि संजय हनिमूनला गेले असताना संजयने त्याच्या मित्रांसोबत करिश्माचा सौदा केल्याचा आरोपही करिश्माने केला आहे. लग्नानंतर अनेक वर्ष करिश्माला मारहाण केली जात होती. एवढेच नव्हे तर संजय कपूरचे पहिल्या पत्नीबरोबर शारीरिक संबंध कायम होते असाही आरोपही करिश्माने केला होता. परंतु लग्न टिकवायचे असल्याने करिश्मा ते सहन करीत होती. गरोदर असताना संजयने आलेला ड्रेस करिश्माला आला नाही त्यामुळे संजय आणि त्याच्या आईने करिश्माचा खूप छळ केला होता. या मारहाणीला कंटाळून अखेर 2012 मध्ये करिश्माने संजय कपूरपासून घटस्फोट घेतला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER