तिची व्यग्रता आणि अपराधी भाव

Stress & Guilt

पहाटे तीन-साडेतीनला उठणाऱ्या मुंबापुरीत रोज किमान चार साडेचार तासांचा प्रवास पार पाडत नोकरी करणारी स्त्री वर्षानुवर्षे धावत असते. गर्दी तर कल्पनेपलीकडची असते. अशा गर्दीमध्ये धक्के खात, तिचा रोजचा प्रवास होतो. ही गोष्ट इतर वेळेची. पावसाळ्यात तर विचारूच नका. घरी असते, तेव्हा ती मुलांना सुट्टीच्या दिवशी उत्तमोत्तम खाणे देणे. मुलांचा अभ्यास, येणार जाणार, सणवार, देव कुळाचार इतर पारंपरिक गोष्टी ह्या सगळ्या साधत ती नोकरीच्या ठिकाणी पोहोचते. दहा मिनिटं उशीर झाला तरी मस्टरवर फुली आणि साहेबांचे टोचून बोलणे ऐकावे लागते. पब्लिक सेक्टर मधले असे दिवस तर फार बदलले आहेत. असा हा मुंबईतील नोकरी करणाऱ्या स्त्रियांचा असीम संघर्ष वर्षानुवर्ष सुरू असतो.

सध्याच्या वर्क फ्रॉम होम च्या काळा तर विचारूच नका. शनिवार रविवार आणि दिवसातला कुठलाही वेळ ऑफिस साठीच असल्यासारखा झालेला आहे. सतत एकाच पोझिशनला बसून मानेचे पाठीचे दुखणे, अनीमिया, डी व्हिटॅमिन ची कमतरता, सततच्या स्ट्रेस मुळे होणारे ताने जन्य आजार वाटतात आहे सतत डोळे लॅपटॉप मध्ये आणि कानाला फोन कॉल्स. अशा या स्त्रियांसमोर असणारे दोन प्रश्न म्हणजे एक तर कुठेतरी त्यांना वाटणार guilt! आपण आपल्या इतर भूमिकांना नीट न्याय देऊ शकत नाही ही गोष्ट त्यांना कायम टोचत राहते.

आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशा परिस्थितीमध्ये मूल जन्माला घालायचं की नाही ? कारण आजची z जनरेशन अत्यंत असमाधान पदरी असलेली आहे. मुळात या जनरेशन असेच प्रश्न वेगळे आहे. त्यामुळे स्त्रियांच्या प्रश्नात आणखीन भर पडते आहे. पुन्हा मूल जन्माला घातलं तर माझ्या करिअरचं काय? प्राधान्यक्रम बदलल्याने स्त्रियांचे स्व कमाईचे, स्वतःच्या आयडेंटिटी चे भान अधिकच सुस्पष्ट झाले असल्याने नोकरी व्यवसायाला प्राधान्य आहे. मूल होऊ दिले तर त्याच्या संगोपनासाठी वेळ देणे आलेच. तोपर्यंत जग थोडंच थांबतेय ! आपलं असणार नॉलेज अपडेट करण्यात वेळ जाईल, चांगल्या नोकऱ्या परत मिळणार नाही आणि या रेस मध्ये आपण मागे पडू. हेही संकट आता समोर आहे. आपल्याकडे कुटुंब व्यवस्था टिकून असल्यामुळे कुटुंबांचा सपोर्ट मिळतो.

ह्याच बाबतीत इतर देशात कुटुंबाचाही सपोर्ट नसल्याने, मुलांच्या संगोपनासाठी किमान मुले आठ ते दहा वर्षांची होईपर्यंत तिने घरी राहणे गरजेचे असल्याची मानसिकता वाढते आहे. त्यामुळे अमेरिकेतील नोकरी सोडणाऱ्या स्त्रियांच्या संख्येत वाढ होत असल्याचे एका अहवालात दिसून येते. मुलांमध्ये वाढणारा एकलकोंडेपणा आणि तीस-पस्तीस वर्षानंतर पुन्हा नोकरीची शक्यता हेही त्या नोकरी सोडण्यामागचा आश्र्वस्त भाव असेल.

अमेरिकेबरोबरच्या इतर देशातही यावर विचार होतो आहे का ? सरकारी पातळीवर काही योजना आहेत का? काही अहवालानुसार जगभरातील इतर देशातही याबाबत एकसारखा मतप्रवाह आहे आईच्या घरी राहण्याला सन्मान दिला गेला पाहिजे , मूल मोठे झाल्यावर परत कामाच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत. इंग्लंडमध्ये मात्र “स्टे एट होम” आईंना युरोपातील इतर राष्ट्रांच्या तुलनेत स्थानिक सरकारकडून फारसे प्रोत्साहन मिळत नाही असा सुर आहे. 2014च्या सर्वेक्षणात जर्मनीमध्ये लहान मुलांसाठी घरी राहणाऱ्या स्त्रियांना सरकारकडून 1520 प्रतिमहिना इतकी रक्कम घरी राहण्यामुळे होणारी आर्थिक नुकसानाची भरपाई म्हणून मिळत असे तर फ्रान्समध्ये 481 ते 570 पौड प्रति महिना इतकी रक्कम बाळंतपणाच्या सहा महिन्यांच्या रजेच्या काळात सरकार कडून मिळते. नॉर्वेतील स्त्रियांना 400 पौड प्रतिमहिना प्रत्येक मुलाच्या वेळेस मूल तीन वर्षाचे होईपर्यंत सरकार देते. दक्षिण आफ्रिकेतही अशा घरी राहणाऱ्या आईसाठी विशेष राहणाऱ्या जोब प्रोफाइल्स उपलब्ध आहेत.

आर्थिक नुकसान भरपाई आणि सुट्टी याबाबत ही सकारात्मक बाब असली तरीही भारतामध्ये असलेल्या कुटुंब व्यवस्थेमुळे मुलांच्या जोपासण्यासाठी कुटुंबियांचा हातभार असतो. परंतु त्याबरोबर येणाऱ्या जबाबदाऱ्या आणि अपेक्षा त्यांचे ओझे किंवा अपराधी भाव वाटू शकतो. दिवसभर मुलांना घरातील ज्येष्ठ व्यक्ती सांभाळत असल्यामुळे त्यांच्या मनाविरुद्ध फार जाता येत नाही. किंवा इतर जबाबदाऱ्या बाबत असलेल्या अपेक्षा पूर्ण कराव्या लागतात.

सध्याच्या नोकऱ्यांचे स्वरुप आणि पूर्वीच्या नोकऱ्यांचे स्वरुप यामध्ये खूप अंतर आहे. ठराविक कालखंडासाठी केवळ कर्मचारी ऑफिसच्या मालकीचे असायचे. आत्ताच्या नोकऱ्यांमध्ये घरी आल्यानंतरही ऑफिसचे ओझे उतरवुन ठेवता येत नाही.

पूर्वीच्या संसार करण्याबाबतच्या कल्पना वेगळ्या होत्या. आता त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे,आणि सगळ्याच घरांमधून तो सहज स्वीकारल्या जात नाही, किंवा अंगवळणी पडलेला नाही असं म्हणूया. पण तरीही त्यावर वेगवेगळे उपाय शोधण्याचा प्रयत्न या महिला करत असतात. 1) घरच्यांचा विश्वास संपादन करून नोकरीचे महत्त्व पटवून देणे.2) प्रसंगी सहकाऱ्यांची मदत घेणे ३) स्वयंपाकात ,जिथे चवीचा प्रश्न येतो तिथे तडजोड करायची नाही पण वरकाम इतर मदतीची कामे यासाठी मदतनीसाची मदत घेणे.४) मी “सुपर वूमन” नाही याचे भान ठेवणे.५) मुलांना स्वावलंबी बनवणे ६) याबरोबरच दिनक्रमाचे व्यवस्थापन .७) स्वतःला बदलणे, निरपेक्ष राहणे ८)स्वतःच्या चुका स्वीकारून सुधारणे .९) काही राहिलं कमी पडलं, विसरलो, हरवलं तर ते सगळे अक्कल खाती जमा करणे. आणि १०) सगळ्यात महत्वाचे म्हणजे स्वतःशी प्रामाणिक राहून, इतरांच्या कॉमेंट्स पासून “आऊट ऑफ कव्हरेज एरिया” राहणे. कटू आठवणी अनुभव “डिलीट “करणे.

ह्या बातम्या पण वाचा : 

मानसी गिरीश फडके
समुपदेशक आणि सायकोथेरपिस्ट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER