म्हणून मुंबई मनपा निवडणूकीत आघाडीत बिघाडीची शक्यता

Hence the possibility of a breakdown in the lead in the Mumbai Municipal Corporation elections

राज्यात महानगर पालिका निवडणूका होणार आहेत. याआधी कधीही एकत्र नसलेल्या शिवसेनाला आघाडीत दिलेल्या स्थानामुळं मतदारांचा मतदानाचा कल काही मतदार संघात बदलू शकतो. ही स्थिती लक्षात घेवून निवडणूका एकत्र लढवायच्या की वेगवेगळ्या या प्रश्नावर महाविकास आघाडीच्या मसलती सुरुयेत.

राज्यातील येत्या मनपा निवडणूकांमध्ये महाविकास आघाडीनं म्हणजे कॉंग्रेस राष्ट्रवादीनं शिवसेनेसोबतच राहून निवडणूक लढवावी हे सुत्र ठरलं असल्याच संजय राऊत (Sanjay Raut)म्हणालेत. यामुळं आगामी मुंबई महानगर पालिका निवडणूकीत तिन्ही पक्ष एकत्र लढणार की कॉंग्रेस एकाकी पडणारा असा प्रश्न उपस्थीत होतोय.

कॉंग्रेस एकाकी पडेल का?

काही मनपा वार्डांमध्ये कॉंग्रेसची ताकद चांगली आहे. शिवसेनेसोबत काँग्रेस निवडणूकीच्या रिंगणात उतरली तर या निर्णायाचा मोठा फटका कॉंग्रेसला बसेल. जनतेच्या मतावर याचा परिणाम होईल या शक्यतेचा काँग्रेस विचार करते आहे.

शिवसेनेसोबत युती करायला कॉंग्रेस करत असलेली टाळाटाळ आणि त्यात राष्ट्रवादीची भूमिका यावर चर्चा केल्या जाताहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या तुलनेत कधीच मुंबईवर ताबा मिळवू शकलेली नाही. शिवसेने सोबत कॉंग्रेस गेल्यास त्यांना जागावाटपात अडचणी येतील. अनेक मतदार संघातील अस्तित्व यामुळं संपेल अशी काँग्रेसला भिती असल्याच राजकीय विश्लेष्कांच म्हणणं आहे.

मुंबईत काँग्रेसचं संघटन चांगलंय. शिवसेनेप्रमाण कॉंग्रेसनं तिथं संघटनात्मक स्तरावर चांगलं काम केलंय. जर दोन्ही पक्षांनी एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तर याचा फटका दोघांना बसू शकतो.

पुण्यातल्या एका पत्रकार परिषदेला उत्तर देताना शिवसेनेचे संजय राऊत म्हणाले होते, “ज्या महापालिकेत ज्या पक्षाची ताकद आहे, त्यांनी पुढाकार घ्यावा. त्या पक्षाच्या नेतृत्वाखाली आघाडी स्थापन व्हावी आणि निवडणुका लढववाव्यात, असं ठरलंय. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नाशिक, संभाजीनगर इथं पूर्णपणे शिवसेनेची ताकद आहे. तिकडे इतर पक्ष तुलनेत कमी आहेत.”

मुस्लिम मतांचा विचार

कॉंग्रेसचा मुस्लिम मतदार शिवसेनेकडं आकर्षित होईल का काय? अशी भिती कॉंग्रेसला असल्याचे मत राजकीय विश्लेष्क व्यक्त करताहेत. काँग्रेसच शिवसेनेसोबत जाणं जर मुस्लीमांना पटलं नाही तर या निवडणूकीत कॉंग्रेसला याचा मोठा फटका बसू शकतो. किंवा कॉंग्रेससोबत घेवून शिवसेनेनं राज्यातल्या सत्तेपासून रोखलं तर भाजपला सत्ता स्थापनेपासून रोखता येण्याची शक्यता आहे. त्यात राज्यात सत्तेवर असणारी शिवसेना मुस्लीमाबांबत मवाळ भूमिका घेते आहे. मुस्लीम मतदार शिवसेनेकडं वळला तर कॉंग्रेसला मोठा फटका बसेल.

या शक्यता असल्या तरी शिवसेनेला मात्र कॉंग्रेसची गरज आहे. मुंबई महानगर पालिका क्षेत्रात मुस्लीम मतांचा आकडा २४ लाखांच्या पार आहे. भाजपला टक्कर देताना कॉंग्रेस सोबत असयला हवी अशी शिवसेनेची इच्छा आहे. राष्ट्रवादीचा विचार केला तर ८-९ नगरसेवकांइतकाच त्यांचा प्रभाव मर्यादीत आहे. मुंबईत राष्ट्रवादीचं वर्चस्व नाही. त्यामुळं शिवसेनेसोबत जावून मुंबईतलं अस्तित्व वाढवण्यासाठी राष्ट्रवादी शिवसेनेसोबत जाईल हे निश्चित असल्याच मत राजकीय विश्लेष्क व्यक्त करताहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER