हेमंत नगराळे यांच्याकडे पोलिस महासंचालकपदाचा अतिरिक्त कारभार

Subodh Jaiswal - Hemant Nagrale

मुंबई :- राज्याचे पोलिस महासंचालक सुबोध जयस्वाल (Subodh Jaiswal) यांची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (Central Industrial Security Force) (सीआयएसएफ) महासंचालक पदावर केंद्रीय समितीने निवड केली. त्यामुळे आज त्यांना राज्य सरकारने पोलिस महासंचालक पदावरून कार्यमुक्त केले. रिक्त झालेल्या पोलिस महासंचालकपदाचा अतिरिक्त कारभार हेमंत नगराळे (Hemant Nagrale) (न्यायिक आणि तांत्रिक विभागाचे पोलिस महासंचालक) यांच्याकडे पुढील आदेश होईपर्यंत सोपविण्यात आला आहे. आज दुपारी साडेतीन वाजता ते पदभार स्वीकारणार आहेत.

सुबोध जयस्वाल यांची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल या पदावर गेल्या आठवड्यात केंद्रीय निवड समितीने वर्णी लावली. त्यानंतर त्यांना कार्यमुक्त करण्याबाबत राज्य सरकारला कळविण्यात आले होते. आज गुरूवारी गृहविभागाने सुबोध जयस्वाल यांना कार्यमुक्त करत असल्याचे आदेश दिले असून हेमंत नगराळे यांच्याकडे अतिरिक्त कारभार सोपविला.

जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजे मकर संक्रातीनंतर राज्याला नवे पोलिस महासंचालक मिळण्याची शक्यता आहे. पोलिस महासंचालकपदासाठी मराठी अधिकारी म्हणून हेमंत नगराळे यांच्या नावाला अधिक पसंती महाविकास आघाडीत असल्याने त्यांची निवड होण्याची दाट शक्यता आहे. सध्या नगराळे हे न्यायिक आणि तांत्रिक विभागाचे पोलिस महासंचालक पदावर कार्यरत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER