पूरग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ मदत देऊ – नितीन राऊत

Dr. Nitin Raut

मुंबई : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे सुरू आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी नुकसानाचा अहवाल सादर केल्यानंतर शेतकऱ्यांना प्रथम खावटी आणि त्यानंतर तात्काळ नुकसान भरपाई देण्यात येईल, अशी माहिती ऊर्जा मंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी दिली.

शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी कोल्हापूर (Kolhapur), सांगली (Sangli) आणि सातारा (Satara) येथे महापुरावेळी लावण्यात आलेल्या निकषांचा वापर करण्यात येणार आहे. त्या निकषांनुसार मदत करण्यात येईल, असे राऊत म्हणालेत.

‘महाज्योती’बाबत मंत्रीमंडळात चर्चा झाली आहे. मंत्रीमंडळाच्या येत्या बैठकीत महाज्योतीला निधी देण्याबाबत निर्णय घेतला जाईल. महाज्योतीच्या घटनेत स्वायतत्ता नमूद आहे. मात्र, शासन निधी देत असल्याने त्यावर नियंत्रण राहणार आहे, असे त्यांनी सांगितले.

मुंबईमधील ‘बत्तीगुल’ प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली आहे. समितीचा अहवाल आल्यानंतर घातपात होता कारण होते हे उघड होईल. मात्र, घातपाताची शक्यता नाकारता येत नाही, असे नितीन राऊत यांनी सांगितले.

अतिवृष्टीमुळे उस्मानाबाद , सोलापूर आणि पंढरपुरात शेतीचे नुकसान झाले आहे. आम्ही शेतकऱ्यांना मदत करणार आहोत पण केंद्र सरकारनेहि मदत केली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER