कोल्हापुरातील महापुराच्या धर्तीवर विदर्भात पूरपीडितांना मदत द्या; फडणवीस यांची मागणी

Devendra fadnavis

गडचिरोली : गेल्यावर्षी कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात आलेल्या महापुराच्या काळात नागरिकांना मदत मिळावी यासाठी भाजपा सरकारने ज्याप्रमाणे ६ जीआर काढून शेतकरी, गावकरी व गरिबांना मोठी मदत केली, त्याच निकषानुसार विदर्भातील पूरग्रस्त जिल्ह्यांना मदत करा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली.

गुरूवारी गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील सावंगी, आमगाव आणि देसाईगंज शहर आणि भंडारा जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांची पाहणी केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

वर्तमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गेल्यावर्षी नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी स्वत: बांधावर गेले होते व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी २५ ते २५ हजार रुपयांची मदत जाहीर करावी, अशी मागणी केली होती. आता तेच मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे त्यांनी आपला शब्द पाळावा आणि त्याप्रमाणे मदत जाहीर करावी अशी मागणी त्यांनी केली.

फडणवीस यांच्यासोबत माजी ऊर्जामंत्री व भाजपाचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे, भाजपाचे विदर्भ संघटन प्रमुख डॉ. उपेंद्र कोठेकर, माजी राज्यमंत्री परिणय फुके, गडचिरोली-चिमूर क्षेत्राचे खासदार अशोक नेते व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER