कोरोनात मातापित्यांचे छत्र हरवलेल्या विद्यार्थ्यांना मदत करा; वर्षा गायकवाड यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Varsha Gaikwad to cm thackeray

मुंबई : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या (Corona Virus) लाटेने थैमान घातले आहे. या संकटकाळात अनेक विद्यार्थ्यांचे पालक मृत पावल्यामुळे त्यांचे छत्र हरवल्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (CM Uddhav Thackeray) मदत करण्याच्या मागणीसंदर्भात पत्र लिहिले आहे.

ही बातमी पण वाचा:- दहावीचा निकाल जूनमध्ये, अभ्यासक्रमावरून मूल्यांकन; वर्षा गायकवाड यांची माहिती 

गोरगरीब, शोषित, वंचित, पीडितांना मदत करून आधार देणे व त्यांना स्वावलंबनाने आयुष्यामध्ये पुन्हा उभे राहण्यासाठी मदत करणे ही महाराष्ट्राची उज्ज्वल परंपरा आहे व ती कोरोनासारख्या साथीच्या महामारीमध्ये निश्चितच जपली पाहिजे. मातापित्यांचे छत्र हरवलेल्या विद्यार्थ्यांना १२ वीपर्यंतचे शिक्षण घेण्याकरिता आर्थिक मदत सुरू करण्याचे शालेय शिक्षण विभागाने नियोजन केले. यासंदर्भात प्रस्ताव सादर केल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्राच्या माध्यमातून दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button