फक्त दौरे नाही, तर शेतकऱ्यांना मदत करा; संभाजीराजेंचा पवारांना टोला

Sharad Pawar - Sambhajiraje Chhatrapati

पंढरपूर : परतीच्या पावसाने मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाले आहे. खर तर मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा करून लोकांना धीर देणे अपेक्षित होते मात्र घरात बसून मुख्यमंत्री कारभार हाकत असल्याने जनतेमध्ये नाराजी वाढू लागली आहे. अशातच भाजपचे (BJP) खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) हे देखील पंढरपूरच्या (Pandharpur) दौऱ्यावर आहेत.

यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये भरपाई देण्यात यावी, अशी मागणी केली. तसंच, ‘फक्त दौरे करू नका, शेतकऱ्यांना मदत करा’ असा अप्रत्यक्ष टोला देखील त्यांनी शरद पवार (Sharad Pawar) व उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) लगावला. तर येत्या ३ दिवसात शेतकऱ्यांच्या मागण्यांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांनी विमा कंपन्यांबद्दल तक्रारी केल्या असून केंद्राकडून पाठपुरावा करण्याच आश्वासन देखील त्यांनी दिलं आहे.

राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला असून त्यांना मदतीची आवश्यकता आहे. त्यांना मदत केली नाही तर, शेतकऱ्यांसमोर आत्महत्या करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरणार नाही. शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तर लोकप्रतिनिधी तसेच सरकार त्याला जबाबदार असेल. तात्काळ मदत जाहीर करा म्हणून शेतकऱ्यांनी मंत्र्यांची गाडी अडवली असेल तर तो त्यांचा अधिकार आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया यावेळी त्यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER