हॅलो, उद्धव बोलतोय, नंतर कॉल करा, मोदीजी निवडणुकीनंतर बोलतील ; सत्यजीत तांबेंचे उपरोधिक ट्विट

CM Uddhav Thackeray - Satyajeet Tambe - PM Narendra Modi

मुंबई :- राज्यात कोरोनाचे (Corona) संकट वाढतच चालले आहे. यापार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यातील संघर्ष चांगलाच पेटला आहे . युवक काँग्रेसचे (Congress) अध्यक्ष सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी उपरोधिकपणे केंद्र सरकारवर टीका केली आहे. सत्यजीत तांबे यांनी उपरोधिक ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि केंद्र सरकारवर यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

सत्यजीत तांबे यांनी त्यांच्या ट्विटमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि पीएमओ कार्यालयादरम्यान झालेला काल्पनिक संवाद मांडला आहे. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पीएमओ कार्यालयालामधील फोन करतात. ते पीएमओ कार्यालयााला महाराष्ट्राला ऑक्सिजन (Oxygen) आणि रेमडेसिव्हीरच्या (Remdesivir) पुरवठ्यासंदर्भात नरेंद्र मोदी यांच्याशी बोलायचं असल्याचं सांगतात. तर पीएमओ कार्यालयाकडून पीएम सध्या डू नॉट डिस्टर्ब मोडवर असल्याचं उत्तर येतं. यावर उद्धव ठाकरे पंतप्रधान कधी उपलब्ध होतील, असे विचारतात. त्यानंतर पीएमओ कार्यालय ते 2 मे नंतर सर्व राज्यांच्या निवडणुका पार पडल्यानंतर उपलब्ध होतील, असं सांगते. सत्यजीत तांबे यांनी या उपरोधिक ट्विटद्वारे केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button