नमस्कार, मी अजित पवार बोलतो; चित्रकारासाठी होता सुखद धक्का

Ajit Pawar - Mahesh Maske

सोलापूर : पिंपळाच्या पानावर अजित पवार (Ajit Pawar) यांचे चित्र काढून पाठवणाऱ्या महेश मस्के (Mahesh Maske) या चित्रकाराला फोन करून पवार यांनी त्याचे चित्रासाठी अभिनंदन केले व त्याची विचारपूस केली; महेशसाठी हा सुखद धक्का होता.

महेश दिव्यांग आहे. सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यातील जामगाव येथे राहतो. लॉकडाऊनमध्ये (Lockdown) पेन्सिल चित्रासाठी लागणारे साहित्य त्याच्याकडे नाही. कामही नाही त्यामुळे तो पिंपळाच्या पानावर चित्र (पोट्रेट) काढतो. यात त्याने शरद पवार, सोनू सूद आणि इतरांची चित्र काढली आहेत.

महेशने अजित पवार यांचे चित्र काढून बारामतीला पाठवले. त्याआधी त्याने अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचेही चित्र काढून पाठवले होते. अजित पवार यांच्या घरचा फोन नंबर मिळवून सुनेत्रा यांना त्यांचे चित्र पाठवल्याचे कळवले होते. त्यावेळी सुनेत्रा यांनी महेशचा फोन नंबर सेव्ह केला होता. त्यानंतर महेशने अजित पवारांचे चित्र काढून सुनेत्रा पवार यांना पाठवले. सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांना चित्र दाखवले. अजित पवारांनी महेशला फोन करुन त्यांच्या चित्रकेलेचे कौतुक केले. त्याची विचारपूस केली. कोरोनाच्या काळात काळजी घेण्याची सूचना केली आणि कोरोनाची साथ संपल्यावर भेटू, असे सांगितले.

महेश म्हणतो – अजित पवारांनी, नमस्कार. मी अजित पवार बोलतो असे फोनवर सांगितले त्यावेळी माझा विश्वास बसला नाही. पण, मी त्यांचा आवाज ओळखला. मला सुखद धक्का बसला. अजित पवार मला फोन करतील, असे मला कधी वाटलेच नव्हते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button