सलीम खान यांच्या या वैशिष्ट्यावर फिदा झाल्या होत्या हेलन

Helen-Salim Khan

बॉलिवूड (Bollywood) इंडस्ट्रीत १९५०-६० च्या दशकात आपल्या आयटम डान्सने लोकांना वेड लावणार्‍या हेलन यांचा आज ८४ वा वाढदिवस आहे. जेव्हा हेलन आयटम साँगवर नाचायच्या तेव्हा प्रेक्षकांना नृत्य करण्यास भाग पडत होते. तो काळ होता जेव्हा लोक त्यांचे नृत्य पाहण्यास उत्सुक होते. सन १९८० मध्ये हेलन यांनी सलीम खान (Salim Khan) यांच्याशी लग्न केले. या खास प्रसंगी सलीम आणि हेलन यांच्या प्रेमकथेबद्दल जाणून घेऊ.

जेव्हा हेलन यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा सलीम खान यांचेलग्न झाले होते. त्यावेळी ते ४५ वर्षांचे होते आणि हेलन ४२ वर्षांच्या. सलीम खान वयाच्या २३ व्या वर्षी अभिनेता होण्यासाठी मुंबईत आले. शहरात कित्येक वर्षे राहिल्यानंतर सुशीला चरक यांच्याशी १९६४ मध्ये लग्न केले. त्यानंतर एका वर्षानंतर सलमान खानचा जन्म झाला. इंडस्ट्रीत काही काळानंतर त्यांची भेट हेलन यांच्याशी झाली. त्या चमकदार डान्समुळे स्टार म्हणून उदयास येत होत्या.

हेलन यांचेही लग्न झाले होते. त्यांनी प्रेम नारायण अरोराशी लग्न केले; परंतु १९७४ साली त्यांचा घटस्फोट झाला. ‘काबिल खान’ चित्रपटादरम्यान हेलन आणि सलीम यांची भेट झाली असे म्हणतात. येथूनच दोघांची प्रेमकथा सुरू झाली. त्यावेळी सलीम यांनी हेलनला खूप मदत केली. काळानुसार त्यांचे नाते अधिक दृढ झाले आणि मग एके दिवशी दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

एका मुलाखती दरम्यान, हेलन यांना विचारले की, सलीम यांच्या कोणत्या वैशिष्ट्याने तुम्हाला सर्वांत जास्त आकर्षित केले? तेव्हा हेलन म्हणाल्या, सलीम यांच्याकडे एक गोष्ट आहे, ज्यामुळे ते इंडस्ट्रीमधील इतर पुरुषांपेक्षा वेगळे आणि खास आहेत. मी त्यांचा खूप आदर करते. ते अशी व्यक्ती आहेत, मला कोणताही स्वार्थ न ठेवता मदत केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by • (@indiann_songs)

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@rockstarrr5198)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER