कोल्हापूर पुण्यासह दहा जिल्ह्यात येत्या चार दिवसात मुसळधार पाऊस

पुणे : दहा जिल्हयात ऑरेंज अलर्ट (Orange alert) जाहीर केला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा,सोलापूर, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद या दहा जिल्हयांना हवामान विभागाने शुक्रवारी ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे या भागांत येत्या चार दिवसांत सरासरी 80 मिलिमिटर इतका पाऊस (Heavy rains) पडण्याची शक्यता आहे.

राज्यात थांबलेला पाऊस पुन्हा सक्रिय होत आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने वाऱ्याचा वेग ताशी 50 ते 60 किलोमीटर वाढला आहे. 19 ते 22 सप्टेंबर या कालावधीत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.

कोल्हापूर, पुण्यासह दहा जिल्ह्यांत हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट पुकारला आहे. गेले आठ दिवस पावसाने राज्यात बहुतांश भागांत दडी मारली होती. त्यामुळे कमाल तापमान वाढले होते. हिमालयाच्या पायथ्यापासून तेलंगण, विदर्भ या भागात चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. तर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाडा भागात 19 ते 22 सप्टेंबर या कालावधीत मुसळधार पाऊस पडेल असा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. हे वातावरण आज शनिवारपासून बदलणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER