पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात जोरदार पाऊस; कोकणात आंब्याचे नुकसान

Heavy Rain in Pune

पुणे :- हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रातील बहुतांश भागांत रविवारी रात्री आणि सोमवारी पावसाने हजेरी लावले. गेल्या मंगळवारपासून सिंधुदुर्गसह राज्यातील तुरळक भागांत पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर आज पुणे, सोलापूरच्या (Solapur) काही भागात पावसाने वादळासह हजेरी लावली.

Heavy rain in Maharashtraपुण्यात दुपारच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. यामुळे काही भागातील बत्ती गुल झाली. तर सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, पंढरपूर परिसरातदेखील पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे शेतातील ज्वारीसह अन्य पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्गमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. कोकण किनारपट्टी भागात चक्रिय वाऱ्याची स्थिती निर्माण झाल्यामुळे पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. जिल्ह्यात सध्या सर्वत्र ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे कमाल आणि किमान तापमानात काहीशी घट झाली आहे. अवकाळी पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

चिपळूण तालुक्यातील शिरगाव व सह्याद्री खोऱ्यातील परिसरात काल आणि आज जोरदार पाऊस कोसळला. या पावसामुळे शेतकरी, व्यापारी आणि ग्रामस्थांची तारांबळ उडाली. वादळी वाऱ्यामुळे अनेकांच्या घरांवर झाडे पडली, लाखोंचे नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसाचा फटका आंबा पिकाला बसला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button