शिराळा तालुक्यात बुधवारी अतिवृष्टी

सांगली : निसर्ग वादळाचा थेट परिणाम सांगली परिसरावर झाला नसलातरी पाऊस मात्र दिवसभर थांबला नव्हता. कोकणचे प्रवेशद्वार मानल्या जात असलेल्या शिराळा तालुक्यात अतिवृष्टी झाली. सकाळपासूनच्या आठ तासात तब्बल 75 मिलीमीटर पावसाची नोंद झाली तर वारणाधरण परिसरात झाडांची पडझड झाली.

हवामान खात्याने सांगली आणि परिसरात बुधवारी अतिवृष्टीचा ईशारा दिलेला होता. या पार्श्‍वभूमीवर स्थानिक यंत्रणांनीही खबरदारी घेतलेली होती. परंतु शिराळा तालुक्याचा परिसर वगळता इतर ठिकाणी पावसाचा फारसा जोर नव्हता. जिल्ह्याच्या सर्वच भागात दिवसभर रिमझीम पाऊस बरसत राहिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER