रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पाऊस

Heavy Rain

रत्नागिरी/प्रतिनिधी : आज दुपारपासूनच संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.

रविवारी दुपारपासून किनारपट्टी भागामध्ये वारेही वाहू लागले आहेत. अरबी समुद्रात सध्या दोन मोठी चक्री वादळे असून त्यापैकी एकाने आफ्रिका खंडातील येमेनच्या दिशेने जाण्यास सुरवात केली आहे. तर दुसऱ्या चक्रीवादळाची सध्याची दिशा गुजरातच्या दिशेने असून ते येत्या 3 जून रोजी रत्नागिरीच्या किनारपट्टीवरून पुढे सरकणार आहे. यावेळी प्रचंड वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून त्याचाच परिणाम म्हणून पावसाला सुरुवात झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER