मुंबईत मुसळधार : पंतप्रधान मोदींची मुख्यमंत्र्यांशी चर्चा, सर्वोतोपरी मदतीचे आश्वासन

CM Thackeray-Narendra Modi

मुंबई :- मुंबईसह उपनगरात सुरू असलेल्या वादळी वाऱ्यासह पडत असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर संपर्क साधून परिस्थिती जाणून घेतली.

मुसळधार पावसामुळे मुंबई व आजूबाजूच्या परिसरातील परिस्थितीविषयी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याशी चर्चा झाली. पंतप्रधानांनी सर्वोतोपरी मदतीचे आश्वासन दिले. अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली आहे.

दरम्यान, मुंबई (Mumbai) आणि कोकण किनारपट्टीच्या दिशेला ७० किमी प्रतितास वेगाने वारे वाहत आहेत. हे वारे ६ ऑगस्टपर्यंत सुरु राहतील, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. तसेच आज मुंबईसह उपनगरात कोसळणाऱ्या पावसाने दुपारनंतर वेग धरला.

ही बातमी पण वाचा : मुंबईत पुढचे २४ तास अतिवृष्टीचे, विनाकारण घराबाहेर पडू नका – मुख्यमंत्री

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER