मराठवाडा, पश्चिम विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा

heavy rains in Mumbai

मुंबई : मराठवाड्यात कालपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी नद्यांना पूर आला आहे. दरम्यान, येत्या २४ तासांत मराठवाडा, पश्चिम विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मुंबई, ठाण्यासह कोकणातही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मराठवाड्यात कालपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. नांदेड जिल्ह्यातील मुखेड शहर आणि तालुक्यात रात्री तुफान पाऊस झाला तर काही भागात अतिवृष्टी झाली.

तुफान पावसामुळे मुखेड शहरालगत असलेल्या मोती नाल्यास पूर आला. रात्री या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. नाल्यालगत असलेल्या स्मशानभूमीत पाणी शिरल्याने तिन्ही भागाच्या संरक्षण भिंती कोसळल्या. या ठिकाणी कर्मचाऱ्यांसाठी तयार केलेला निवारा वाहून गेला. शहरातील फुलेनगर भागातील अनेक घरांमध्ये नाल्याचे पाणी शिरल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER