कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात धो धो पाऊस

Heavy Rains

पुणे : कोल्हापूर (Kolhapur), सांगली (Sangli) आणि सातारा (Satara) जिल्ह्यात परतीच्या पावसाने (Heavy Rains) सलग तिसऱ्या दिवशी दमदार हजेरी लावली. पावसाचा परतीचा प्रवास सुरू झाला असून गेल्या पंधरा दिवसांपासून उघडीप दिलेल्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान केले आहे. अनेक ठिकाणी ढगफुटी सारखा पाऊस कोसळत आहे. पावसामुळे खरीपाची काढणी लांबणीवर गेली तर रब्बीची पेरणीसह आडसाल उसाची लागणही खोळंबली आहे. भात, भुईमूग, सोयाबिन, बाजरी, मका ही प्रामुख्याने खरीपातील कापणीला आलेली पिके धोक्यात आली आहेत. सांगलीतील द्राक्ष आणि साताऱ्यातील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.

वादळी वाऱ्यासह ढगफुटी सारखा कोसळणाऱ्या पावसामुळे हाताला आलेली पिके भुईसपाट झाल्याने बळीराजा धास्तावला आहे.

दरम्यान, सांगली, मिरजेसह जिल्ह्यात ठिकठिकाणी धो धो पाऊस सुरू झाला आहे. विशेषत: दुष्काळी भागातील आटपाडी, जत, कवठेमहांकाळ आणि खानापूर या तालुक्यांना पावसाने झोडपून काढले. मुसळधार पावसामुळे अग्रणी नदीला पूर आला तर पुलावरून पाणी गेल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली आहे. खानापूर तालुक्यात जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस झाल्याने विविध ठिकाणी मोठे नुकसान झाले. वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या घटनेत तीन व्यक्ती वाहून गेल्या. मिरज पूर्वभागातील आरग, बेडग, म्हैसाळ, लिंगनूर, सोनी आदी परिसरात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे द्राक्ष पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. खानापूर तालुक्यात ढगफुटी सारख्या झालेल्या पावसाने तालुक्यातील बहुतांश ओढे आणि नद्यांना महापूर आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER