कोल्हापुरात मुसळधार पाऊस : शनिवारपर्यंत पावसाचा मुक्काम

Kokan Rain-Orange Alert

कोल्हापूर :- कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून परतीच्या पावसाने सळो की पळो करुन सोडले. काल, मंगळवारी रात्री नऊनंतर करवीर तालुक्‍याच्या पश्‍चिम भागासह गगनबावडा, पन्हाळा, शाहूवाडी तालुक्‍यात दहा ते पंधरा मिनिटेच ठिक-ठिक़ाणी अतिवृष्टी झाली. जोरदार वाऱ्यामुळे अनेकांच्या घरांचे पत्रे उडून गेल्याच्या घटनाही घडल्या. आज सकाळपासून पावसाने पुन्हा जोरदार सुरुवात केली आहे.

येत्या शनिवारपर्यंत (ता.१७) विजेच्या कडकडाटासह मुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्‍यता असल्याने महाराष्ट्र शासना आपत्ती व्यवस्थापनाच्या कक्ष अधिकाऱ्यांनी जिल्ह्यांना सर्तकतेचा इशारा दिला आहे. विजा पडण्याची शक्‍यता असल्याने लोकांनी घरा बाहेर पडू नये. तसेच मोठ्या पावसात कोणत्याही झाडाखाली उभे राहून नये, अशा सूचना आपत्ती व्यवस्थापनाकडून करण्यात आल्या आहेत.

ही बातमी पण वाचा : पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रातील लाखो हेक्टर पिके धोक्यात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER