पुढचे चार दिवस कोकण आणि विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा

Heavy rain in Kolhapur

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसानं पुन्हा सुरुवात केली आहे. मागच्या दोन दिवसांपासून काही ठिकाणी तुरळक तर काही जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस बरसत आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं त्याचा परिणाम महाराष्ट्रात दिसू लागला आहे.

शनिवारी संध्याकाळी मुंबई, ठाण्यासह उपनगरांमध्ये काही भागांत हलक्या तर काही परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. पुढचे चार दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडेल असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, पुणे या भागांमध्ये येत्या २४ तासांत वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

४ आणि १५ सप्टेंबर रोजी विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात मध्यम ते हलक्या सरी बरसतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर १६ सप्टेंबर रोजी विदर्भ आणि कोकणातील अनेक भागांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER