साताऱ्यात दीड हजार हेक्टर पिके गेली पाण्यात

Heavy Rain In Satara

सातारा : अतिवृष्टी व पुरपरिस्थितीमुळे कृषी विभागाच्या प्राथमिक नजर अंदाजानुसार जिल्ह्यातील एक हजार 527 हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान (Crop damage on 527 hectares) झाले आहे. या नुकसानीचे संबंधित विभागांनी तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करावा, अशी सूचना पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.

पालकमंत्री पाटील यांनी अंबवडे बुद्रुकमध्ये (ता. सातारा) अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भातपिकाची पाहणी केली.गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कृषी विभागाच्या प्राथमिक नजर अंदाजानुसार सातारा तालुक्‍यातील भात, सोयाबीन व भुईमूग- 70 हेक्‍टर, कोरेगाव तालुक्‍यातील सोयाबीन, भाजीपाला व आले- 130 हेक्‍टर, खटाव तालुक्‍यातील बटाटा, कांदा- 90 हेक्‍टर, कऱ्हाडमधील भात, ज्वारी- 40 हेक्‍टर, पाटण तालुक्‍यातील भात- 190 हेक्‍टर, खंडाळा तालुक्‍यातील भाजीपाला- 10 हेक्‍टर, वाई तालुक्‍यातील भात, सोयाबीन व भाजीपाला- 9 हेक्‍टर, महाबळेश्वर तालुक्‍यातील भात- 350हेक्‍टर, फलटण तालुक्‍यातील भाजीपाला, मका व ज्वारी- 375 हेक्‍टर, माण तालुक्‍यातील ज्वारी व मका- 510 हेक्‍टर तसेच इतर असे एकूण एक हजार 520 क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे.

ह्या बातम्या पण वाचा :