पुण्यात मुसळधार पाऊस आणि ढगफुटी ; शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान

Heavy Rain

मुंबई : राज्यात एकीकडे कोरोनाचे (Corona) संकट आहे तर दुसरीकडे पावसामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे . पुणे (Pune) जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील लाखणगाव, पोंदेवाडी, अवसरी परिसरात शनिवारी सायंकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावली. मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने एक प्रकारे ढगफुटीसारखी अवस्था पाहायला मिळाली. यात शेतीचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं तर काही ठिकाणी शेतीच वाहून गेल्याचं चित्र आहे.

माहितीनुसार, लाखणगाव, पोंदेवाडी या दोन्ही गावांमधील तलाव, राजोबा पाझर तलाव यामधून खूप वेगाने पाण्याचा विसर्ग झाल्याने ओढ्यालगतच्या शेतात पाणी घुसले. या भागात पंचनामे करावे आणि नुकसान मिळावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे. असा पाऊस आणि अशी ढगफुटी कधीही पाहिली नाही, असं या परिसरातील शेतकऱ्यांनी म्हटलं आहे.

पुण्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख (Rajendra Deshmukh) आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद (Ayush Prasad) बटाटा पिकाची पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करून परतले आहेत. पुन्हा एकदा या परिसरात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER