पुढील चार दिवस मुसळधार पावसाचे

पुणे :  बंगालच्या उपसागरातील (Bay of Bengal) पश्चिम मध्यभाग आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा कायम आहे. त्यामुळे पुढील चार दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील अनुक्रमे पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, सोलापूर, नाशिक, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांत मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस (Heavy rain) पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

बंगालच्या उपसागरातील दक्षिण पश्चिम भागात असलेली चक्रीय स्थिती पुढील दोन ते तीन दिवसात पश्चिम उत्तर भाग आणि त्यानंतर तेलंगणाकडे सरकणार आहे. तसेच दक्षिण गुजरात किनारपट्टीपासून ते उत्तर कर्नाटक पर्यंत द्रोणीय स्थिती असून, पुढील पाच दिवसांनंतर ही स्थिती पश्चिम किनारपट्टीकडे सरकणार आहे. याचा प्रभाव राज्यात जाणवणार आहे. त्यामुळे 19 सप्टेंबरपर्यंत काही भागात मुसळधार पाऊस पडेल. विशेषत: मराठवाडा व विदर्भात दमदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER