सांगलीत परतीच्या पावसाची दमदार हजेरी

सांगलीत परतीच्या पावसाची दमदार हजेरी

सांगली : सांगलीत (Sangli) दुसऱ्या दिवशी शहरासह जिल्ह्याला परतीच्या पावसाचा तडाखा बसला. मागील सलग दोन दिवस दुपारनंतर पावसाने संततधार रिपरिप सुरूच ठेवली. कडेगाव तालुक्‍यात येरळा, नांदणी नद्यांना पूर आला. पलूस, आटपाडी तालुक्‍यालाही पावसाने दणका दिला. आटपाडी तालुक्‍यात वाहतूक ठप्प झाली. सोयाबीन, भात आणि उसाचे मोठे नुकसान झाले आहे. द्राक्ष छाटणीही शेतकऱ्यांना थांबवावी लागली. शेतकऱ्यांसमोर संकट उभे आहे.

अनेक भागात रस्ते खराब असल्याने त्यात पाणी साचून डबकी तयार होउन वाहनधारकांची पंचाईत झाली, तर उपनगरासह गुंठेवारीत या सततच्या रिपरिपीमुळे जनजीवन विस्कळित झाले. कडेगाव, पलूस, आटपाडी तालुक्‍यातही पावसाने जनजीवनावर परिणाम झाला. सांगली शहरासह परिसरात दुपारपासून आभाळ भरून आले आणि संततधार सुरू झाली. सुटीचा दिवस असल्याने बाजारात नागरिकांची बऱ्यापैकी वर्दळ होती. पावसामुळे त्यांची तारांबळ उडाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER