वजनदार मंत्र्यांनी आपल्या जिल्ह्यासोबत इतर जिल्ह्यांचाही विचार करावा – देवेंद्र फडणवीस

devendra fadnavis

गडचिरोली : महाविकास आघाडी सरकारमधील वजनदार मंत्र्यांनी कोरोनाच्या काळात आपल्या जिल्ह्यात आरोग्याच्या सुविधा नेताना राज्याच्या इतर जिल्ह्यांचाही विचार करावा. ते केवळ त्या जिल्ह्याचे मंत्री नसून राज्याचे मंत्री आहेत हे लक्षात घ्यावे’ अशी मिस्कील टीका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी केली आहे. गडचिरोलीत आलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या काही वजनदार मंत्र्यांवर निशाना साधत खोचक टीका केली.

माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्यांनी शुक्रवारी गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोविड सेंटरला भेट देऊन आरोग्यविषयक सुविधांची पाहणी केली. तसेच कोविड सेंटरला भेट देऊन रुग्णांशी संवाद साधला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्यातील कोविडच्या परिस्थितीचा आढावा घेतला. बैठकीनंतर उच्च न्यायालयाचा संदर्भ देऊन देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच्या जिल्ह्यात नेण्यात आलेल्या आरोग्याच्या सुविधेवरुन नाव न घेता अप्रत्यक्षपणे काही मंत्र्यांवर निशाणा साधला. केली. ‘राज्याच्या काही वजनदार मंत्र्यांनी ते एका जिल्ह्याचे किवा तालुक्याचे मंत्री नसून राज्याचे मंत्री आहेत हे लक्षात ठेवले पाहिजे. अशा आरोग्य सुविधांची खरी गरज अतिदुर्गम आदिवासीबहुल जिल्ह्याला आहे, याचा विचार मंत्र्यांनी करावा.

यावेळी त्यांनी जिल्ह्यात लसीकरण मोहीमेवर भर देण्याची सुचना केली. तसेच भाजपचे खासदार आणि आमदारांनी दौरे करुन जनजागृती करत असून जिथे अतिदुर्गम भागात अडचण आहे, तिथे कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा, अशी सुचनाही केली. गडचिरोली जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालयाची आवश्यकता असून केंद्र सरकारकडे प्रस्ताव आल्यास आपण स्वतः त्या संदर्भात व्यक्तीशा पाठपुरावा करू, असे आश्वासन फडणवीस यांनी यावेळी दिले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button