गोस्वामी यांच्या हायकोर्टातील याचिकेवर सुनावणी अपूर्ण

bombay HC & Arnab Goswami

Ajit Gogateमुंबई : अलिबाग येथील अन्वय नाईक या कंत्राटदारास केलेल्या कामाचे पैसे वेळेत न  देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून रायगड पोलिसांनी केलेल्या अटकेविरुद्ध अर्णव गोस्वामी यांनी केलेल्या याचिकेवर शुक्रवारी अपूर्ण राहिलेली सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात शनिवारी दुपारी पुढे होईल. गुरुवारप्रमाणेच शुक्रवारीही न्यायालयाने गोस्वामी यांना दिलासा मिळेल,असा कोणताही तातडीचा आदेश देण्यास नकार दिला.

न्या. संभाजी शिवाजी शिंदे व न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने गोस्वामी यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील हरीष साळवे व आबाद पोंडा यांचा युक्तिवाद ऐकला. उद्या शनिवारी राज्य सरकार/पोलीस व मूळ फिर्यादी आणि अन्वय यांच्या पत्ीन अक्षता यांच्यातर्फे युक्तिवाद होईल.

अलिबागच्या मुख्य न्यायदंडाधिकाºयांनी गोस्वामी यांना न्यायालयीन कोठडी देताना दिलेल्या निकालपत्राकडे लक्ष वेधत साळवे यांनी सांगितले की, आधी नोंदविलेला गन्ह्याचा तपास, सबळ पुरावा न मिळाल्याने, कायदेशीरपणे बंद करण्यात आल्यानंतर न्यायालयाकडून परवानगी न घेता व नवा गुन्हाही न नोंदविता तपास सुरु करणे बेकायदा असल्याचे दंडाधिकाºयांनीही नमूद केले आहे.  शिवाय त्यांनी अन्वय नाईक यांच्या कथित ‘स्युईसाईड नोट’चा खरेपणा व अन्वय आणि त्याची आई कुमुदिनी यांच्या मृत्यूंचा परस्पर संबंध याविषयीही प्रश्न उपस्थित केले आहेत. अशा परिस्थितीत गोस्वामी यांना अटक करणेच मुळात बेकायदा ठरते.

ते असेही म्हणाले की, गोस्वामी व अन्वय यांचे संबंध व्यावसायिक होते. गोस्वामी यांच्याकडून येणे असलेले पैसे मिळाले नाहीत म्हणून त्यांनी स्वत:च्या जीवाचे बरेवाईट करून घेणे संभवनीय वाटत नाही. केवळ संशय घेतल्याने किंवा आरोप केल्याने आत्महत्येशी दुसºया कोणाचा संबंध जोडता येत नाही. त्यासाठी काही तरी ठोस पुरावा असायला हवा. तसा या प्रकरणात कुठेच दिसत नाही.

गोस्वामी यांना अद्दल घडविण्यासाठीच सरकार त्यांच्या मागे हात धुवून लागले आहे व रायगड प्रकरणातील अटक हा त्याच कुटीलतेचा भाग आहे, असे सांगत साळवे असेही म्हणाले की, गोस्वामी यांना अटक केली जाईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेतच सांगून टाकले. यावरूनच सरकारचा हेतू स्पष्ट होतो.

दरम्यान, गोस्वामी व अन्य दोन आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्याच्या न्याय दंडाधिकाºयांच्या निकालाविरुद्ध रायगड पोलिसांनी अलिबाग येथील सत्र न्यायालयात फेरविचार याचिका केली असून त्यावरही शानिवारीच सुनावणी व्हायची आहे.

अजित गोगटे

Disclaimer :-‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER