एकनाथ खडसेंवरील गुन्हा रद्द होणार? आज कोर्टात सुनावणी

Maharashtra Today

मुंबई: राष्ट्रवादीचे (NCP) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्याविरोधात ईडीने (ED Case) गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा रद्द व्हावा म्हणून खडसे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून त्यावर आज सुनावणी होणार आहे. तसेच ईडीही आज खडसेंविरोधात अतिरिक्त प्रतिज्ञापत्र कोर्टात सादर करणार आहे. त्यामुळे खडसेंविरोधातील गुन्हा रद्द होणार का? याकडे सर्वांचे लक्ष केंद्रित आहे .

ईडीने एकनाथ खडसे यांची सुमारे साडेसहा तास कसून चौकशी केली होती. त्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा रद्द व्हावा म्हणून खडसे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर गुरुवारी कोर्टात सुनावणी झाली. कोर्टात खडसे यांच्या वकिलांनी गुन्हा रद्द करण्याची जोरदार मागणी केली. तर ईडीच्या वकिलांनी त्याला विरोध केला. आमच्याकडे खडसेंविरोधात अनेक पुरावे आहेत. अनेक साक्षीदार आहेत. याबाबत आम्हाला कोर्टात अतिरिक्त प्रतिज्ञापत्रं सादर करायचं आहे. त्यामुळे खडसेंवरील गुन्हा रद्द करू नये, असं ईडीने म्हटलं होतं. त्यावर कोर्टाने ईडीला अतिरिक्त प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. ईडी आज हे प्रतिज्ञापत्रं कोर्टात सादर करणार आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER